फक्त 55 रुपये महिना जमा करा, 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर मिळवा 3000 रुपयांची पेन्शन! कोणती आहे ही स्किम?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
भारतात अनेक सरकारी योजना चालवल्या जातात. ज्या सर्वसामान्य लोकांना माहितीच नसतात. आज आपण अशाच एका योजनेविषयी जाणून घेणार आहोत.
advertisement
1/7

मुंबई : भारत सरकारकडून विविध सरकारी योजना चालवल्या जातात. यामध्ये सर्व स्तरांतील लोकांचा विचार घेऊन योजना सुरू केलेल्या असतात. तुम्ही असंघटीत क्षेत्रात काम करत असाल आणि रिटायरमेंटनंतर तुमच्या उत्पन्नाविषयी चिंतेत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.
advertisement
2/7
केंद्र सरकारची प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजने अंतर्गत तुम्ही खुप कमी गुंतवणुकीत दरमहा 3 हजार रुपयांची पेन्शन मिळवू शकता. ही योजना अशा लोकांसाठी तयार करण्यात आली आहे ज्यांच्याकडे EPF किंवा इतर पेन्शन सुविधा नाही.
advertisement
3/7
ही एक स्वैच्छिक आणि अंशदायी पेन्शन स्किम आहे. ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या वयाच्या हिशोबाने दरमहा थोडं योगदान द्यावं लागतं. उदाहरण पाहायचं झाल्यास ,तुमचं वय 18 वर्षे असेल तर तुम्हाला फक्त 55 रुपये प्रति महिना जमा करावा लागेल. 60 वर्षाच्या वयानंतर तुम्हाला दरमहा 3000 रुपयांची गॅरंटीड पेन्शन मिळण्यास सुरुवात होईल.
advertisement
4/7
सरकारही देते समान योगदान : या स्किमची सर्वात खास गोष्ट म्हणजे, तुम्ही जेवढे पैसे जमा कराल तेवढेच पैसे सरकारही देते. म्हणजेच तुमची संपूर्ण गुंतवणूक अर्धी होते आणि फायदा दुप्पट होतो. याच कारणामुळे ही स्किम कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर ठरतेय.
advertisement
5/7
या योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो? : या स्किमचा फायदा 18 ते 40 वर्षे वय असणारे लोक घेऊ शकतात. पण त्यांचे उत्पन्न हे 15 हजार रुपये किंवा त्याहून कमी असायला हवे. सोबतच ते EPF, ESIC किंवा NPS सारख्या कोणत्याही पेन्शन योजनेशी कनेक्ट नसावेत. यात मजूर, रिक्षा चालक, घरगुती कामगार, लहान दुकानदार आणि स्ट्रीट वेंडर सारखे लोक सहज सामिल होऊ शकतात.
advertisement
6/7
अर्ज कसा करायचा? : या स्किममध्ये रजिस्ट्रेशन करणे खुप सोपं आहे. तुम्ही जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर(CSC) वर जाऊन अर्ज करू शकता. यासोबतच ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातूनही रजिस्ट्रेशन सुविधा उपलब्ध आहे. देशभरात लाखो लोक पहिल्यापासूनच या स्किमशी जोडले आहेत.
advertisement
7/7
या स्किमचे फायदे काय? : 60 वर्षांनंतर तुम्हाला दरमहा गॅरंटीड 3 हजार रुपयांची पेन्शन मिळेल. कमी गुंतवणुकीत भविष्य सुरक्षित राहील. सरकारकडून समान योगदान मिळतं. सहज आणि सुलक्ष रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
फक्त 55 रुपये महिना जमा करा, 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर मिळवा 3000 रुपयांची पेन्शन! कोणती आहे ही स्किम?