TRENDING:

बँकेपेक्षा जास्त व्याजदर देणारी Post office ची भन्नाट स्कीम, महिन्याला कमवा 5,550 रुपये

Last Updated:
पोस्ट ऑफिसची मंथली इनकम स्कीम MIS ही ५ वर्षांची सुरक्षित योजना असून ७.४ टक्के वार्षिक व्याज देते. सिंगल अकाउंटसाठी ९ लाख, जॉईंटसाठी १५ लाख मर्यादा आहे.
advertisement
1/6
बँकेपेक्षा जास्त रिटर्न, Post officeची भन्नाट स्कीम, महिन्याला कमवा 5,550 रुपये
आजच्या काळात प्रत्येक सामान्य व्यक्तीला आपला पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवायचा असतो, जिथे चांगले आणि खात्रीशीर उत्पन्न मिळेल. देशातील सामान्य नागरिकांना पोस्ट ऑफिस अनेक दशकांपासून अशा सुरक्षित गुंतवणुकीच्या योजनादेत आहे आणि या योजनांवर लोकांचा विश्वास आजही कायम आहे. यातीलच एक अत्यंत लोकप्रिय योजना म्हणजे मासिक उत्पन्न योजना.
advertisement
2/6
पोस्ट ऑफिसची मंथली इनकम स्कीम (MIS) ही नेहमीच एक सुरक्षित सरकारी बचत योजना राहिली आहे. या योजनेत तुम्ही एकदाच मोठी रक्कम गुंतवता आणि त्यानंतर तुम्हाला दर महिन्याला फिक्स व्याज मिळतं. या योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिची मॅच्युरिटी (परिपक्वता) अवधी फक्त ५ वर्षांची आहे.
advertisement
3/6
सध्या पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीमवर ७.४% वार्षिक दराने व्याज दिले जातं आणि या व्याजाची रक्कम दर महिन्याला थेट तुमच्या खात्यात जमा होतं. या योजनेत गुंतवणुकीची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
advertisement
4/6
सिंगल अकाउंटमध्ये (एका व्यक्तीच्या खात्यात) तुम्ही जास्तीत जास्त ९ लाख रुपये गुंतवू शकता, तर जॉईंट अकाउंटमध्ये (जॉईंट अकाउंटमध्ये ) १५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची परवानगी आहे.
advertisement
5/6
पोस्ट ऑफिसमध्ये MIS खाते उघडण्यासाठी तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातेअसणे आवश्यक आहे. हे बचत खाते असणे महत्त्वाचे आहे, कारण तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर मिळणारे मासिक व्याज थेट याच बचत खात्यात जमा केले जाते, ज्यामुळे तुम्हाला तुमचे उत्पन्न वेळेवर मिळते.
advertisement
6/6
बँक किंवा बँकेच्या FD स्कीम देखील एवढे रिटर्न्स देत नाहीत. तुम्हाला फक्त ही रक्कम पोस्टात जमा करायची आणि त्यावर तुम्हाला व्याज मिळायला सुरुवात होईल. या स्कीमचे डिटेल्स तुम्ही indiapost.gov.in या वेबसाईटवर जाऊन देखील पाहू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
बँकेपेक्षा जास्त व्याजदर देणारी Post office ची भन्नाट स्कीम, महिन्याला कमवा 5,550 रुपये
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल