TRENDING:

PPF मध्ये पैसे गुंतवल्यास सुरक्षा मिळते, पण ही स्किम खरंच तुमच्यासाठी बेस्ट? जाणून घ्या सत्य

Last Updated:
नवं आर्थिक वर्ष सुरू झालं आहे. या काळात लोकं गुंतवणुकीविषयी पुन्हा नव्याने प्लॅनिंग सुरू करतात. अनेक लोक पीपीएफमध्ये गुंतवणूक करतात. पण काहींच्या मनात ही स्किम खरंच फायदेशीर का असा प्रश्न निर्माण होतो.
advertisement
1/7
PPF मध्ये पैसे गुंतवल्यास सुरक्षा मिळते, पण ही स्किम खरंच तुमच्यासाठी बेस्ट? जाणून घ्या सत्य
PPF Scheme: आजच्या काळात गुंतवणुकीचं महत्त्व सर्वांनाच कळालं आहे. अशावेळी लोकं हे सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असतात. सरकारही लोकांच्या सुरक्षेसाठी विविध स्किम चालवत असते. यामधीलच एक स्किम म्हणजे पीपीएफ स्किम आहे.
advertisement
2/7
या स्किमवर अनेक लोकांनाचा विश्वास आहे. कारण यात गुंतवणूक सुरक्षित राहते आणि फिक्स्ड व्याज मिळतं. पण तरीही काहींच्या मनाता प्रश्न असतो की, ही गुंतवणूक योजना खरंच आपल्यासाठी फायदेशीर आहे का?
advertisement
3/7
लोकांना का आवडते ही योजना : दीर्घकाळापासून गुंतवणूकदारांमध्ये Public Provident Fund एक विश्वासार्ह ऑप्शन म्हणून समोर आली आहे. याचं मोठं कारण म्हणजे ही सरकारद्वारे चालवली जाते.
advertisement
4/7
याच कारणामुळे यावर शेअर मार्केटमधील चढ-उताराचा परिणाम होत नाही. यासोबतच गुंतवणूकदारांना फिक्स्ड रिटर्न मिळतं. सोबतच ही स्किम EEE श्रेणीत येते. म्हणजेच यामध्ये गुंतवणूक, मिळणारं व्याज आणि मॅच्योरिटीवर मिळणारी रक्कम तिन्हीवर टॅक्स लागत नाही. याच कारणामुळे लोकांना आजही पीपीएफवर विश्वास आहे.
advertisement
5/7
महागाईच्या तुलनेत मर्यादित रिटर्न : पीपीएफ सध्या 7.1 टक्के व्याज देते. पण महागाई वेगाने वाढतेय. हे पाहता मिळणारं रिटर्न हे महागाईच्या बरोबरीने मिळत नाही. मात्र लोकांना सुरक्षित रिटर्न हवं असतं म्हणून पीपीएफ योजना अजुनही लोकप्रिय आहे.
advertisement
6/7
लॉक-इन आणि लिमिटशी संबंधित समस्या : अनेक गुंतवणूकदारांसाठी Public Provident Fund मध्येगुंतवणूक करताना लिक्विडिटी एक मोठं आव्हान असतं. कारण यात 15 वर्षांचा लॉक-इन पीरियड असतो. सोबतच गरज पडल्यावर तुम्ही लगेच पैसे काढू शकत नाही. यासोबतच वार्षिक गुंतवणुकीची जास्तीत जास्त मर्यादा ही 1.5 लाख रुपये ठरली आहे. जास्त गुंतवणूक करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही रक्कम कमी वाटू शकते.
advertisement
7/7
यासोबतच गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंड आणि एसआयपीसारखे ऑप्शनही वेगाने आपली जागा निर्माण करत आहेत. खरतर यात गुंतवणूक केल्यावर रिटर्नसह जोखिमचा धोकाही जास्त असतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
PPF मध्ये पैसे गुंतवल्यास सुरक्षा मिळते, पण ही स्किम खरंच तुमच्यासाठी बेस्ट? जाणून घ्या सत्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल