TRENDING:

Success Story : 5000 रुपयांत सुरू केला व्यवसाय, प्रीतिका यांचा ब्रँड ठरतोय हिट, कमाईचा आकडा तर पाहा

Last Updated:
प्रीतिका सिंग यांची यशोगाथा खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. अवघ्या 5000 रुपयांपासून सुरू झालेला त्यांचा छोटासा कपड्यांचा व्यवसाय आज तब्बल 5 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
advertisement
1/7
5000 रुपयांत सुरू केला व्यवसाय, प्रीतिका यांचा ब्रँड ठरतोय हिट, कमाईचा आकडा तर पाहा
मुंबईतील दादर परिसरात राहणाऱ्या प्रीतिका सिंग यांची यशोगाथा खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. अवघ्या 5000 रुपयांपासून सुरू झालेला त्यांचा छोटासा कपड्यांचा व्यवसाय आज तब्बल 5 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
advertisement
2/7
प्रीतिका सिंग यांचे बालपण अत्यंत संघर्षमय होते. लहान वयातच वडिलांचे निधन झाल्याने आयुष्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी शिक्षणही पूर्ण केले आणि आयुष्याशी दोन हात केले. कठीण परिस्थितीतही त्यांनी कधी हार मानली नाही.
advertisement
3/7
लग्नानंतरही त्यांच्या आयुष्यातील संघर्ष संपला नाही. मुलाच्या जन्मानंतर सासरकडून त्यांना घराबाहेर काढण्यात आले. हा काळ अत्यंत कठीण होता, पण त्या खचल्या नाहीत.
advertisement
4/7
स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा त्यांनी ठाम निर्धार केला. याच काळात माने साहेब यांनी त्यांना 5000 रुपयांची मदत केली. या छोट्याशा रकमेचे त्यांनी मोठ्या संधीमध्ये रूपांतर केले. अवघ्या 100 स्क्वेअर फुट जागेत त्यांनी कपड्यांचे छोटे दुकान सुरू केले. मेहनत, चिकाटी आणि ग्राहकांचा विश्वास यांच्या जोरावर त्यांचा व्यवसाय हळूहळू वाढत गेला.
advertisement
5/7
मात्र आयुष्यात संकटे थांबली नाहीत. 2024 मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले जो त्यांच्या आयुष्यातील मोठा धक्का होता. तरीही त्यांनी स्वतःला सावरले आणि व्यवसाय अधिक जोमाने पुढे नेला.
advertisement
6/7
या संपूर्ण प्रवासात त्यांच्या आईने त्यांना खंबीर साथ दिली. प्रीतिका सिंग यांचा ठाम विश्वास आहे की, प्रत्येक महिलेनं स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले पाहिजे. मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास असेल, तर यश निश्चित मिळते.
advertisement
7/7
आज त्यांच्या रुही कलेक्शन या दुकानात लखनवी कुर्त्यांचा आकर्षक संग्रह उपलब्ध आहे. हे कुर्ते थेट लखनऊहून मागवले जातात आणि ग्राहकांसाठी 8XL पर्यंत विविध साईजमध्ये उपलब्ध आहेत. प्रीतिका सिंग यांची ही प्रेरणादायी यशोगाथा अनेक महिलांना स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची नवी उभारी देत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Success Story : 5000 रुपयांत सुरू केला व्यवसाय, प्रीतिका यांचा ब्रँड ठरतोय हिट, कमाईचा आकडा तर पाहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल