TRENDING:

Loan : प्री पेमेंट करून लोन क्लोज करायचा विचार करताय? मग थांबा, नुकसान टाळण्यासाठी आधी हे गणित समजून घ्या

Last Updated:
कर्ज वेळेआधी फेडणं (Prepayment) हा नेहमीच फायद्याचा सौदा असतो असं नाही. कधीकधी घाईघाईत घेतलेला हा निर्णय तुम्हाला फायद्याऐवजी आर्थिक फटका देऊ शकतो. त्यामुळे तुम्हीही तुमचं लोन क्लोज करण्याचा विचार करत असाल, तर त्याआधी हे गणित समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे.
advertisement
1/8
Loan : प्री पेमेंट करून लोन क्लोज करायचा विचार करताय? मग थांबा, नुकसान टाळण्यासाठी आधी हे गणित समजून घ्या
गरजा कधीच संपत नाहीत आणि त्या पूर्ण करण्यासाठी अनेकदा आपल्याला बँकेच्या कर्जाचा आधार घ्यावा लागतो. मग ते घराचं नूतनीकरण असो, मुलांचं शिक्षण किंवा एखादं तातडीचं वैद्यकीय काम किंवा अगदी बाईक, कार किंवा फोनसाठी आपण सहजच लोन घेतो. लोक सुरुवातील विचार करतात की आता लोन घेतो मग पैसे आले की एकदाच भरुन लोन क्लिअर करतो म्हणजे झालं. शिवाय एकदा का लोन घेतलं की, डोक्यावरच्या या कर्जाच्या डोंगराचं ओझं आपल्याला कधी उतरवू असं होऊन जातं. हातपाय मारून जेव्हा आपल्याकडे थोडे जास्तीचे पैसे जमा होतात, तेव्हा आपला पहिला विचार असतो चला, लोनचे पैसे भरून टाकूया आणि टेन्शन फ्री होऊया.
advertisement
2/8
पण थांबा! कर्ज वेळेआधी फेडणं (Prepayment) हा नेहमीच फायद्याचा सौदा असतो असं नाही. कधीकधी घाईघाईत घेतलेला हा निर्णय तुम्हाला फायद्याऐवजी आर्थिक फटका देऊ शकतो. त्यामुळे तुम्हीही तुमचं लोन क्लोज करण्याचा विचार करत असाल, तर त्याआधी हे गणित समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे.
advertisement
3/8
1. सुरुवातीच्या काळातच होतो खरा फायदालोनच्या प्रीपेमेंटचा खरा फायदा तेव्हाच मिळतो, जेव्हा तुम्ही कर्जाच्या सुरुवातीच्या काळातच पैसे भरता. समजा, तुम्ही ५ वर्षांसाठी कर्ज घेतलं आहे आणि पहिल्याच वर्षभरात तुम्ही ते फेडण्याचा विचार करत असाल, तर तुमची मोठी बचत होऊ शकते.
advertisement
4/8
तुमच्या ईएमआय (EMI) मधील सुरुवातीचा मोठा हिस्सा हा व्याजासाठी कापला जातो आणि मुद्दल कमी प्रमाणात कमी होतं. त्यामुळे सुरुवातीलाच कर्ज फेडलं तर तुम्ही पुढच्या अनेक वर्षांचं व्याज वाचवू शकता.
advertisement
5/8
शेवटच्या टप्प्यात घाई नकोचजर तुमच्या कर्जाचा कालावधी संपायला अवघे काही महिने किंवा शेवटचं एक-दोन वर्ष उरलं असेल, तर अशा वेळी प्रीपेमेंट करणं फारसं शहाणपणाचं ठरत नाही. याचं कारण असं की, तोपर्यंत तुम्ही व्याजाचा मोठा हिस्सा बँकेला भरलेला असतो. शेवटच्या टप्प्यात तुम्ही फक्त मुद्दल भरत असता. अशा वेळी खिशातले साठवलेले पैसे एकदम भरून तुम्हाला व्याजात विशेष कोणतीच बचत मिळत नाही. उलट ते पैसे तुम्ही दुसरीकडे गुंतवले तर त्यावर अधिक परतावा मिळू शकतो.
advertisement
6/8
प्रीपेमेंट चार्जेसचं गणित विसरू नका बँका समाजसेवा करण्यासाठी कर्ज देत नाहीत. जर तुम्ही कर्ज वेळेआधी फेडलं, तर बँकेचं होणारं व्याजाचं नुकसान भरून काढण्यासाठी त्या तुमच्याकडून 'प्रीपेमेंट पेनल्टी' किंवा 'फोरक्लोजर चार्जेस' वसूल करतात. साधारणपणे बँका शिल्लक रकमेवर 2 ते 4 टक्के शुल्क आकारतात. जर तुमची व्याजातील बचत या शुल्कापेक्षा जास्त असेल, तरच कर्ज फेडण्यात अर्थ आहे. अनेकदा असं होतं की, आपण वाचवतोय 5 हजार आणि बँक चार्जेस लावतेय 7 हजार, अशा वेळी तुम्ही फायद्याऐवजी तोट्यात जाता.
advertisement
7/8
तज्ज्ञांचा सल्ला काय?आर्थिक तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही ईएमआय सहजपणे भरू शकत असाल आणि कर्जाचा मोठा काळ उलटून गेला असेल, तर प्रीपेमेंट टाळलेलं बरं. तुमच्याकडे असलेले जास्तीचे पैसे तुम्ही म्युच्युअल फंड (SIP) किंवा फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवले, तर कर्जाच्या व्याजापेक्षा जास्त परतावा तुम्हाला मिळू शकतो.
advertisement
8/8
थोडक्यात सांगायचं तर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या बँकेच्या अटी आणि शर्ती (Terms & Conditions) नीट वाचा. प्रीपेमेंट केल्यावर नक्की किती रुपयांचं व्याज वाचणार आहे आणि किती चार्जेस लागणार आहेत, याचा हिशोब कागदावर मांडून पहा. मगच लोन क्लोज करण्याचा निर्णय घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Loan : प्री पेमेंट करून लोन क्लोज करायचा विचार करताय? मग थांबा, नुकसान टाळण्यासाठी आधी हे गणित समजून घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल