रेल्वेच्या तिकीटासाठी मोजावे लागणार जास्त पैसे, मुंबई ते नागपूर अन् नाशिक ते दिल्ली इथे पाहा संपूर्ण डिटेल्स
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
रेल्वे तिकीट दरात 26 डिसेंबरपासून प्रति किमी 1 ते 2 पैसे वाढ, 215 किमीपेक्षा जास्त प्रवासासाठी लागू. मुंबई, दिल्ली, सोलापूरसह अनेक मार्ग महागले. वर्षात दुसरी दरवाढ.
advertisement
1/6

बसपेक्षा रेल्वेनं जाणं केव्हाही सोयीचं वाटतं आणि पैशांच्या दृष्टीनंही खिशाला परवडणारं असतं. जिथे बस पोहोचत नाही तिथे अनेक ठिकाणी अनेक गावांमध्ये रेल्वे जाते, त्यामुळे रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. रेल्वेनं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. रेल्वेनं प्रवास करत असाल तर तुम्हाला तिकीटासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
advertisement
2/6
प्रति किमी 1 ते 2 पैशांची तिकीटात भाडेवाढ करण्यात आली आहे. हे नवीन दर 26 डिसेंबरपासून लागू होणार आहेत. 215 किमीपर्यंत जे प्रवास करणार आहेत त्यांना मात्र हा नियम लागू होणार नाही. मात्र लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी हे दर लागू होणार आहेत.
advertisement
3/6
215 किमीपेक्षा जास्क प्रवास करत असेल तर त्यासाठी प्रत्येक किमीमागे 1 पैसे वाढ होणार आहे. ही दरवाढ जनरल तिकीटासाठी असेल, तर नॉन एसी गाड़्यांसाठी 2 पैसे वाढ होणार आहे. उदा. छत्रपती संभाजीनगर ते मुंबई अंतर 373 किमी आहे तर नॉन एसीसाठी 8 रुपये वाढ होईल. देवगिरी एक्सप्रेसचं तिकीट ६६३ असेल तर ६७० ते ६७१ रुपयांपर्यंत होईल.
advertisement
4/6
संभाजीनगर ते ते दिल्ली 1403 किमी अंतर असल्याने एसी आणि नॉन एसी तिकीटासाठी 28 रुपयांची दरवाढ केली आहे. जे तिकीट सध्या 770 रुपये आहे ते ७९८ रुपये होईल. सोलापूर मुंबई प्रवास 5 रुपयांनी महाग झालं आहे.
advertisement
5/6
संभाजीनगर ते मुंबई 8 रुपयांनी महाग झाली आहे. तर नाशिक दिल्ली 27 रुपयांनी महाग झाली आहे. मुंबई ते दिल्ली AC चं तिकीट 56 रुपयांनी महाग झालं आहे. यापूर्वी 28 रुपयांनी वाढ केली होती आता थेट 56 रुपयांनी वाढ केली आहे.
advertisement
6/6
500 किमीपर्यंत जर एखादा प्रवासी रेल्वेनं नॉन एसीनं प्रवास करत असेल तर त्याला तिकीटासाठी 10 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. वर्षभरात रेल्वेनं तिकीटाच्या दरात ही दुसऱ्यांदा दरवाढ केली आहे. त्यामुळे नव्या वर्षाआधी ग्राहकांच्या खिशाला चांगली कात्री लागणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
रेल्वेच्या तिकीटासाठी मोजावे लागणार जास्त पैसे, मुंबई ते नागपूर अन् नाशिक ते दिल्ली इथे पाहा संपूर्ण डिटेल्स