TRENDING:

सततचे खेटे थांबणार! एकदाच 3 महिन्याचं रेशन घेता येणार, काय आहे सरकारचा नवा नियम?

Last Updated:
केंद्र सरकारकडून एप्रिलमध्ये तीन महिन्यांचे रेशन एकत्र मिळणार, E KYC अनिवार्य. गहू तांदूळ साठवण्याची संधी आणि रांगेच्या त्रासातून दिलासा.
advertisement
1/6
सततचे खेटे थांबणार! एकदाच 3 महिन्याचं रेशन घेता येणार, काय आहे सरकारचा नवा नियम?
आधीच इराण युद्धामुळे गॅस सिलिंडर महाग झाला आणि घरातल्या चुली पेटल्या. महागाईचा भडका उडाला असताना आता सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारी एक बातमी आहे. केंद्र सरकारने रेशनबाबत एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. ज्यांच्या घरात रेशनचं धान्य येतं त्यांना तीन महिन्यांचं धान्य एकत्र मिळणार आाहे.
advertisement
2/6
सरकारच्या या निर्णयामुळे कोट्यवधी कुटुंबाना मोठा दिलासा मिळणार आहे. दर महिन्याला रेशन दुकानावर जाणं, तिथं रांगेत उभं राहून रेशन भरण्याची कटकट आता संपणार आहे. शिवाय महागाईत रेशनवर मिळालेलं धान्य म्हणजे सर्वात मोठा आधार मिळेल.
advertisement
3/6
सरकारने नवी व्यवस्था लागू केली असून, आता एप्रिल, मे आणि जून २०२६ या तीन महिन्यांचा रेशनचा कोटा एकाच वेळी दिला जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मजुरीवर जाणाऱ्यांना फायदा होणार आहे. दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना, जिथे रेशन दुकान घरापासून खूप लांब आहे, त्यांच्यासाठी ही सर्वात मोठी सोय असेल.
advertisement
4/6
एप्रिल महिन्यातच तुम्हाला पुढील तीन महिन्यांचे धान्य गहू, तांदूळ एकत्र घेण्याची मुभा मिळणार आहे. जे लोक कामासाठी बाहेर असतात किंवा ज्यांना दरमहा वेळ काढता येत नाही, त्यांच्यासाठी ही मोठी पर्वणी आहे. रेशन दुकानांवरील ई-पॉस मशीनद्वारेच हे वितरण होईल, त्यामुळे कोणाचेही धान्य बुडणार नाही.
advertisement
5/6
तुमच्या जवळच्या अधिकृत रेशन दुकानात जाऊन तुम्ही हा लाभ घेऊ शकता. फक्त जाताना स्वतःचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड सोबत ठेवा, जेणेकरून डिजिटल पडताळणीमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. सरकारने ठरवून दिलेल्या वेळेत गेल्यास तुम्हाला गर्दीविना आणि सन्मानाने तुमचे धान्य मिळू शकेल.
advertisement
6/6
सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांची E KYC झालं नाही त्यांना मात्र या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही अजूनही रेशन कार्डचं E KYC केलं नसेल तर लगेच करून घ्या. नाहीतर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
सततचे खेटे थांबणार! एकदाच 3 महिन्याचं रेशन घेता येणार, काय आहे सरकारचा नवा नियम?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल