TRENDING:

होळीची सरकारी सुट्टी 3 की 4 मार्चला? पाहा देशात किती तारखेला बंद राहतील बँका

Last Updated:
Bank Holidays in March 2026: अगदी दोन दिवसांवर होळीचा सण आला आहे. या दरम्यान कोणत्या दिवशी ऑफिस बंद राहतील याची घोषणा करण्यात आली आहे. विशेषतः बँका कधी बंद असणार याविषयी आरबीआयने तारीखही घोषित केली आहे.
advertisement
1/7
होळीची सरकारी सुट्टी 3 की 4 मार्चला? पाहा देशात किती तारखेला बंद राहतील बँका
देशभरात उत्साहात साजरा केला जाणारा होळीचा सण हा दोन दिवसांवर आलाय. पण तो 3 मार्चला आहे की 4 मार्चला याविषयी अनेकांमध्ये कंफ्यूजन पाहायला मिळतेय. मात्र होळीची सरकारी सुट्टी स्पष्ट झाली आहे. होळीच्या निमित्ताने कोणत्या दिवशी बँकांसह अनेक सरकारी ऑफिस बंद राहतील याची घोषणा करण्यात आली आहे.
advertisement
2/7
भारतीय रिझर्व्ह बँकांनी मार्च 2026 साठी बँक सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. यामध्ये राष्ट्रीय आणि क्षेत्रीय सणांमुळे वेगवेगळ्या तारखांवर बँक शाखा बंद राहतील. ही यादी खुप महत्त्वपूर्ण आहे कारण सर्व राज्यामध्ये सुट्टया सारख्या नसतात. काही सण काही भागांमध्येच साजरे केले जातात.
advertisement
3/7
तुम्हालाही या आठवड्यात बँकांशी संबंधित काही काम असेल तर तुमच्या शहर/राज्याच्या हिशोबाने तारीख तुम्ही पाहू शकता. की कधी सुट्टी राहील आणि कधी बँका खुल्या राहतील.
advertisement
4/7
होळीच्या आसपास बँकांच्या सुट्ट्या : होळी 2026 रंगांचा प्रमुख सण 4 मार्च (बुधवार) रोजी येतो, परंतु आरबीआयच्या यादीनुसार, होळीशी संबंधित वेगवेगळे दिवस विविध शहरे/राज्यांमध्ये सुट्ट्या म्हणून घोषित केले जातात.
advertisement
5/7
दरम्यान, सोमवार, 2 मार्च 2026 रोजी कानपूर आणि लखनौ सारख्या काही शहरांमध्ये होलिका दहनासाठी बँका बंद राहतील. इतर बहुतेक ठिकाणी बँका नेहमीप्रमाणे काम करतील.
advertisement
6/7
मंगळवार, 3 मार्च 2026 रोजी, होळी/धुळंदीनिमित्त अनेक प्रमुख शहरांमध्ये बँक शाखा बंद राहतील. या शहरांमध्ये मुंबई, दिल्ली, कोलकाता, पाटणा, रांची, भोपाळ, डेहराडून, गुवाहाटी, हैदराबाद, नागपूर, पणजी, बेलापूर आणि विजयवाडा यांचा समावेश आहे. रहिवाशांनी बँक सेवांसाठी आधीच नियोजन करावे. म्हणजेच महाराष्ट्रात 3 मार्च रोजी बँकांना सुट्टी असणार आहे.
advertisement
7/7
या दिवशी सुट्ट्या असण्याचा अर्थ असा होता नाही की, बँकिंगीच्या सर्व सेवा बंद राहतील. ऑनलाइन बॅकिंग सेवा म्हणजेच मोबाईल,नेट बँकिंग, यूपीआय, एटीएम या सेवा सुरु राहतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
होळीची सरकारी सुट्टी 3 की 4 मार्चला? पाहा देशात किती तारखेला बंद राहतील बँका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल