Gold River : भारतातील अशा नद्या ज्यामधून वाहातं सोनं, कोणीही काढून बनू शकतं मालामाल, 'या' गोष्टी तुम्हाला माहितीयत?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
या नद्यांच्या पाण्यात आणि वाळूमध्ये छोटे-छोटे सोन्याचे कण सापडतात. सोशल मीडियावर तुम्ही अनेकदा असे व्हिडिओ पाहिले असतील, जिथे लोक पॅन किंवा लाकडी प्लेटच्या मदतीने नदीच्या वाळूतून सोने शोधतात. हे दृश्य पाहायला जितकं आकर्षक वाटतं, प्रत्यक्षात तेवढीच त्यामागे मेहनत आणि संयमाची गरज असते.
advertisement
1/7

सोन्याचे दर</a> काही दिवसांनी बदलतात कधी आकाशाला भिडतात, तर कधी थोडे खाली येतात. पण तुम्हाला माहीत आहे का, जगात काही नद्या अशा आहेत ज्यामधून खरंच सोनं वाहतं? होय, या नद्यांच्या पाण्यात आणि वाळूमध्ये छोटे-छोटे सोन्याचे कण सापडतात. सोशल मीडियावर तुम्ही अनेकदा असे व्हिडिओ पाहिले असतील, जिथे लोक पॅन किंवा लाकडी प्लेटच्या मदतीने नदीच्या वाळूतून सोने शोधतात. हे दृश्य पाहायला जितकं आकर्षक वाटतं, प्रत्यक्षात तेवढीच त्यामागे मेहनत आणि संयमाची गरज असते." width="1200" height="900" /> सोने म्हणजे केवळ दागिना नाही, तर भारतीयांसाठी भावना आणि गुंतवणुकीचं प्रतीक आहे. सोन्याचे दर काही दिवसांनी बदलतात कधी आकाशाला भिडतात, तर कधी थोडे खाली येतात. पण तुम्हाला माहीत आहे का, जगात काही नद्या अशा आहेत ज्यामधून खरंच सोनं वाहतं? होय, या नद्यांच्या पाण्यात आणि वाळूमध्ये छोटे-छोटे सोन्याचे कण सापडतात. सोशल मीडियावर तुम्ही अनेकदा असे व्हिडिओ पाहिले असतील, जिथे लोक पॅन किंवा लाकडी प्लेटच्या मदतीने नदीच्या वाळूतून सोने शोधतात. हे दृश्य पाहायला जितकं आकर्षक वाटतं, प्रत्यक्षात तेवढीच त्यामागे मेहनत आणि संयमाची गरज असते.
advertisement
2/7
भारतामध्येही अशा नद्यांचा समावेश आहे ज्या खरंच सोने वाहतात. झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यांतून वाहणारी स्वर्णरेखा नदी ही त्यातील सर्वात प्रसिद्ध नदी आहे. स्थानिक लोक शतकानुशतकं या नदीच्या वाळूतून सोने शोधत आले आहेत. म्हणतात, या नदीतील सोन्याच्या कणांमुळे जुन्या काळी अनेक गावं आर्थिकदृष्ट्या सक्षम होती.
advertisement
3/7
अरुणाचल प्रदेशातील सुबनसिरी नदीउत्तर भारतातील सुबनसिरी नदी ही देखील सोन्याच्या कणांसाठी ओळखली जाते. अरुणाचल प्रदेशातील आदिवासी समाज आजही पारंपरिक पद्धतीने नदीच्या वाळूतून सोने वेचतात. त्यांच्या दृष्टीने हे केवळ एक नैसर्गिक साधन नाही, तर त्यांच्या आजीविकेचं महत्त्वाचं साधन आहे.
advertisement
4/7
जगातही वाहतात ‘सोनेरी नद्या’फक्त भारतातच नव्हे, तर जगभरात अशा अनेक नद्या आहेत ज्या सोन्याच्या कहाण्या सांगतात. अमेरिकेतील मिसौरी नदी 19व्या शतकात ‘गोल्ड रश’साठी प्रसिद्ध होती. हजारो लोकांनी या नदीच्या वाळूतून सोने शोधलं आणि काहींचं आयुष्यच बदललं.
advertisement
5/7
त्याचप्रमाणे मोंटाना राज्यातील बिग होल नदीतूनही मोठ्या प्रमाणात सोने सापडलं होतं. या शोधांनी अमेरिकेच्या इतिहासात नवीन पर्व सुरू केलं.
advertisement
6/7
कनाडाची क्लोंडाइक नदी19व्या शतकाच्या उत्तरार्धात कनाडातील क्लोंडाइक नदीत सोन्याच्या शोधाने प्रचंड खळबळ माजवली. हजारो लोक सोन्याच्या शोधात या प्रदेशात आले. काहींना सोने मिळालं आणि ते श्रीमंत झाले, तर काहींना मिळाली फक्त मेहनत आणि आशा.
advertisement
7/7
नदीच्या वाळूतून सोने मिळवणं सोपं काम नाही. पाणी आणि वाळू सतत धुवून, पुन्हा पुन्हा गाळून, सूक्ष्म कण वेगळे करणं ही एक संयम, कौशल्य आणि अनुभवाची प्रक्रिया आहे. त्यामुळे सोशल मीडियावर दिसणाऱ्या चमकदार व्हिडिओंच्या मागे अनेक दिवसांची मेहनत आणि संघर्ष दडलेला असतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold River : भारतातील अशा नद्या ज्यामधून वाहातं सोनं, कोणीही काढून बनू शकतं मालामाल, 'या' गोष्टी तुम्हाला माहितीयत?