TRENDING:

सिमकार्डपासून ते प्रवासापर्यंत १ मार्चपासून बदलणार 8 नियम, तुमच्या खिशावर थेट परिणाम

Last Updated:
मार्चपासून सिम बाइंडिंग, RailOne अ‍ॅप, एलपीजी दर, बँक नियम, क्रेडिट स्कोअर तपासणीसह अनेक बदल लागू होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होईल.
advertisement
1/9
Rule Change: सिमकार्डपासून ते प्रवासापर्यंत १ मार्चपासून बदलणार 8 नियम
Rule Change: मार्च महिना म्हणजे सण आणि उत्सव सुरू होण्याचा महिना, या महिन्याच्या सुरुवातीलाच होळी आणि शनिवार रविवारमुळे सलग सुट्ट्या आल्या आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या खिशावर मोठा भार पडणार आहे. त्याचं कारण म्हणजे प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला नियम बदलतात. त्यामध्ये आता सिमकार्डपासून ते सिलेंडरपर्यंत नियम बदलणार असून त्याचा तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे.
advertisement
2/9
दर महिन्याच्या १ तारखेला गॅस कंपन्या दरांचा आढावा घेतात. उद्या सकाळीच घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे नवीन दर जाहीर होतील. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पाहता, सिलेंडर स्वस्त होणार की महाग, याकडे सर्वांचे लक्ष आहे. सोबतच सीएनजी आणि पीएनजी च्या किमतीतही बदल होण्याची शक्यता आहे.
advertisement
3/9
भारतीय रेल्वेने आता जुन्या UTS अ‍ॅपला निरोप देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून जनरल तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट किंवा अनारक्षित तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला RailOne हे नवीन अ‍ॅप वापरावे लागेल. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी हे नवीन अ‍ॅप डाऊनलोड करून घेणे फायद्याचे ठरेल, अन्यथा ऐनवेळी स्टेशनवर तिकीट काढताना तुमची धावपळ होऊ शकते.
advertisement
4/9
डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी १ मार्चपासून सिम बाइंडिंग अनिवार्य होणार आहे. आता व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम यांसारख्या अ‍ॅप्सना तुमच्या सक्रिय सिम कार्डशी लिंक करणे गरजेचे असेल. जर तुमचे अ‍ॅप सिमशी लिंक नसेल, तर तुम्हाला ते वापरता येणार नाही. यामुळे मल्टी-डिवाइस किंवा वेब व्हर्जन वापरणाऱ्यांना नवीन सुरक्षा अटींना सामोरे जावे लागेल.
advertisement
5/9
काही मोठ्या बँका उद्यापासून त्यांच्या मिनिमम बॅलन्स नियमात किंवा बचत खात्याच्या अटींमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. तसेच, क्रेडिट कार्ड युजर्ससाठी रिवॉर्ड पॉईंट्स किंवा ट्रान्झॅक्शन चार्जेसमध्येही अपडेट्स येऊ शकतात. युपीआय व्यवहारांना अधिक सुरक्षित करण्यासाठी नवीन ओटीपी किंवा मर्यादा बदलण्याची फिचर्सही उद्यापासून दिसू शकतात.
advertisement
6/9
बँकिंग क्षेत्रात आता क्रेडिट स्कोअरची साप्ताहिक तपासणी अधिक कडक केली जाऊ शकते. यामुळे कर्ज घेणाऱ्यांसाठी पारदर्शकता वाढेल, पण त्याचवेळी आपला स्कोअर चांगला ठेवण्याचे आव्हानही असेल.
advertisement
7/9
१ मार्चपासून, डिजिटल पेमेंट वापरकर्त्यांसाठी सुरक्षा आणखी मजबूत केली जाईल. मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी बँकांनी अतिरिक्त पडताळणी लागू करण्याची तयारी केली आहे. जर तुम्ही मोठ्या प्रमाणात पैसे ट्रान्सफर करत असाल, तर फक्त तुमचा UPI पिन वापरणे पुरेसे नाही. बायोमेट्रिक पडताळणी किंवा अतिरिक्त प्रमाणीकरण आवश्यक असू शकते.
advertisement
8/9
१ मार्चपासून रेंट एग्रीमेंट फक्त कागदावरच नाही तर डिजिटल स्वरुपातही रजिस्टर करावं लागणार आहे. याचा फायदा घरमालक आणि भाडेकरून दोघांना होणार आहे. सिक्युरिटी डिपॉझिट केवळ दोन महिन्यांपर्यंतच घेऊ शकतात. याशिवाय जास्त डिपॉझिट आकारल्यास तुम्ही तक्रार करू शकता. घरमालकाची परवानगी मिळाल्यानंतर 24 तासांनंतरच तुम्ही घरात राहायला जाऊ शकता.
advertisement
9/9
१ मार्चपासून, नवीन सिम-बाइंडिंग नियमानुसार, तुमचे व्हॉट्सअॅप, टेलिग्राम किंवा सिग्नल सारखे अॅप्स तुमच्या सक्रिय सिम कार्डशी जोडलेले राहतील. याचा अर्थ असा की जर तुमच्या फोनमधून सिम काढून टाकले किंवा निष्क्रिय केले तर हे अॅप्स काम करणे थांबवू शकतात. डिजिटल फसवणूक रोखणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
सिमकार्डपासून ते प्रवासापर्यंत १ मार्चपासून बदलणार 8 नियम, तुमच्या खिशावर थेट परिणाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल