TRENDING:

अरे देवा, पेमेंट तर होतच नाही! SBI ने बंद केली सर्वात लोकप्रिय सेवा, आता पेमेंट कसं करायचं सांगितली प्रोसेस

Last Updated:
SBI ने mCASH सेवा ३० नोव्हेंबर २०२५ नंतर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांनी UPI, IMPS, NEFT, RTGS या पर्यायी सुविधांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.
advertisement
1/6
SBI ने बंद केली सर्वात लोकप्रिय सेवा, आता पेमेंट कसं करायचं सांगितली प्रोसेस
तुम्ही SBI चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. तुम्ही SBI वरुन पेमेंट करत असाल आणि होत नसेल किंवा काही अडचणी येत असतील तर थांबा तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची सूचना जारी केली. M cash वरुन आता पैसे पाठवता येणार नाहीत. ही सुविधा कायमची बंद केली आहे.
advertisement
2/6
ही सेवा ३० नोव्हेंबर २०२५ नंतर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा OnlineSBI आणि YONO Lite ॲपवर उपलब्ध असणार नाही. त्यामुळे, बँकेने ग्राहकांना आता तिसऱ्या व्यक्तीला पैसे पाठवण्यासाठी UPI, IMPS, NEFT, RTGS यांसारख्या पर्यायी सुविधांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
3/6
mCASH ही पूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाने सुरू केलेली एक तत्काळ पैसे ट्रान्सफर करण्याची सेवा होती. या सेवेद्वारे तुम्ही ज्या व्यक्तीला पैसे पाठवत आहात, त्याच्या बँक खात्याचे तपशील नसतानाही पैसे पाठवता येत होते.
advertisement
4/6
YONO Lite ॲप वापरणारे ग्राहक लाभार्थ्याचा मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आयडी टाकून त्याला पैसे ट्रान्सफर करू शकत होते. 'फंड ट्रान्सफर' मेनूखालील 'mCash' लिंक वापरून ही सुविधा उपलब्ध होती. या सेवेसाठी बँक प्रत्येक व्यवहारावर २.५० रुपये इतके नाममात्र शुल्क आकारत होती.
advertisement
5/6
या सेवेचे वैशिष्ट्य म्हणजे, पैसे स्वीकारणाऱ्या व्यक्तीकडे एसबीआयचे खाते असणे बंधनकारक नव्हते. एकदा पैसे पाठवल्यानंतर, लाभार्थ्याला एसबीआयद्वारे एसएमएस किंवा ईमेलद्वारे एक लिंक आणि सोबतच ८ अंकी पासकोड पाठवला जात होता. हा कोड वापरून mCASH Android ॲपद्वारे पैसे आपल्या खात्यात जमा करू शकत होते.
advertisement
6/6
एसबीआयने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, कारण 'mCASH' ही सुविधा आता UPI, IMPS, NEFT, RTGS यांसारख्या आधुनिक आणि वेगवान पेमेंट पर्यायांच्या तुलनेत कालबाह्य झाली आहे. आजकाल UPI मुळे अशा प्रकारच्या लहान आणि त्वरित व्यवहारांसाठी ग्राहकांना त्वरित आणि शुल्क-मुक्त पर्याय उपलब्ध झाले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
अरे देवा, पेमेंट तर होतच नाही! SBI ने बंद केली सर्वात लोकप्रिय सेवा, आता पेमेंट कसं करायचं सांगितली प्रोसेस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल