TRENDING:

'KYC अपडेट करा नाहीतर अकाउंट ब्लॉक होईल', SBI ने ग्राहकांना दिला अलर्ट

Last Updated:
SBI ने ग्राहकांना बनावट एपीके लिंकद्वारे KYC अपडेटच्या नावाखाली फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. संशयास्पद मेसेज आल्यास १९३० वर तक्रार करा.
advertisement
1/5
'KYC अपडेट करा नाहीतर अकाउंट ब्लॉक होईल', SBI ने ग्राहकांना दिला अलर्ट
तुमचं KYC अपडेट झालं नाही किंवा अपडेट करायचं राहिलं असेल किंवा तुम्ही केलं नसेल तर तुमचं खातं ब्लॉक होईल असे मेसेज SBI च्या ग्राहकांना यायला सुरुवात झाली आहे. याबाबत SBI ने ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. तुम्हाला असा मेसेज आला असेल तर SBI ने जारी केलेली ही सूचना तुम्ही अजिबात मिस करू नका नाहीतर तुमचं नुकसान होऊ शकतं.
advertisement
2/5
सध्याच्या काळात ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. याच पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना एका नवीन आणि गंभीर फसवणुकीच्या पद्धतीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. ही फसवणूक बनावट एपीके लिंक्स वापरून केली जात आहे.
advertisement
3/5
फसवणूक करणारे ग्राहकांना मेसेज किंवा इतर माध्यमातून बनावट एपीके लिंक्स पाठवत आहेत. या लिंक्स 'तुमचे केवायसी अपडेट करा' अशा दावा करतात. या लिंक्सवर क्लिक करून जर तुम्ही कोणतीही फाईल डाउनलोड केली, तर ते तुमच्या मोबाईलमधील संवेदनशील डेटा आणि बँकिंग माहिती चोरण्याचा कट असतो.
advertisement
4/5
या लिंक्सचा उद्देश थेट तुमच्या बँक खात्यातून पैसे चोरणे हा आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना स्पष्ट शब्दात क्लिक करण्यापूर्वी विचार करा असा सल्ला दिला आहे. कोणत्याही अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.
advertisement
5/5
कोणतीही अनोळखी एपीके फाईल किंवा ॲप डाउनलोड करू नका. मेसेजमधील लिंकद्वारे केवायसी किंवा कोणतीही माहिती अपडेट करू नका. ॲप्स नेहमी अधिकृत माध्यमातूनच डाउनलोड करा. ॲप्स डाउनलोड करण्यासाठी नेहमी प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअर या अधिकृत प्लॅटफॉर्मचाच वापर करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
'KYC अपडेट करा नाहीतर अकाउंट ब्लॉक होईल', SBI ने ग्राहकांना दिला अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल