TRENDING:

SBI मध्ये 1 लाख जमा केल्यास मिळेल 52,991 रुपयांचं बंपर व्याज! तेही सरकारी गॅरंटीसह

Last Updated:
आपण सेव्ह केलेल्या पैशांवर चांगलं व्याज मिळावं असं प्रत्येकालाच वाटतं. आज आपण अशाच एका स्किमविषयी जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला 1 लाखांच्या एफडीवर तब्बल 52,991 रुपयांचं रिटर्न मिळेल.
advertisement
1/6
SBI मध्ये 1 लाख जमा केल्यास मिळेल 52,991 रुपयांचं बंपर व्याज! तेही सरकारी गॅरंटीसह
मुंबई : भारतात जास्तीत जास्त लोकांना सुरक्षित गुंतवणूक हवी असते. म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला जास्त नफा मिळण्याची शक्यता असते. मात्र यामध्ये जोखिम असते. यामुळे लोक फिक्स व्याज मिळणाऱ्या स्किमच्या शोधात असतात. जिथे ते निश्चिंत पैसे गुंतवूण चांगलं रिटर्न मिळवू शकतात.
advertisement
2/6
तुम्हीही सुरक्षित गुंतवणूकीच्या शोधात असाल तर गुड न्यूज आहे. भारतीय स्टेट बँक आपल्या फिक्स्ड डिपॉझिट स्किमवर शानदार व्याज देते. विशेष म्हणजे, यामध्ये तुम्हाला सरकारी बँकेच्या गॅरंटीसह वेळेवर फिक्स्ड रिटर्न मिळते. म्हणजेच तुमचा पैसा पूर्णपणे सुरक्षित राहतो आणि नफाही फिक्स असतो.
advertisement
3/6
SBI आपल्या ग्राहकांना FD वर 3.05% ते 7.15% पर्यंत व्याज देत आहे. तुम्ही फक्त 7 दिवसांपासून तर 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी FD करू शकता. SBI च्या 444 दिवसांच्या अमृत वृष्टी स्पेशल FD स्किम खुप चर्चेत आहे. यामध्ये बँक सामान्य नागरिकांना 6.45% व्याज, वरिष्ठ नागरिकांना 6.95% व्याज आणि अति वरिष्ठ नागरिकांना 7.05% व्याज देते. या व्यतिरिक्त 5 ते 10 वर्षांच्या FD वरही बँक आकर्षक व्याजदर देत आहे. ही स्किम अशा लोकांसाठी बेस्ट आहे. ज्यांना सुरक्षित गुंतवणुकीसह स्थिर कमाईही हवी आहे.
advertisement
4/6
1 लाख रुपयांवर किती रिटर्न मिळेल : तुम्ही SBI मध्ये 6 वर्षांसाठी 1 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो. सामान्य नागरिकांना 1 लाखांवर 43,373 रुपये व्याज मिळू शकते. वरिष्ठ नागरिकांना 52,092 व्याज मिळू शकतं. तर अति वरिष्ठ नागरिकांना 52,991 व्याज मिळू शकतं. फक्त 1 लाख जमा करुन तुम्ही 52,991 पर्यंत फिक्स्ड व्याज कमवू शकता.
advertisement
5/6
FD ही एक सुरक्षित गुंतवणूक का आहे? : एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की त्यावर बाजारातील चढ-उतारांचा परिणाम होत नाही. तुम्हाला पूर्वनिश्चित व्याजदर मिळतो आणि मुदतपूर्तीनंतर तुमची संपूर्ण रक्कम परत मिळते.
advertisement
6/6
गुंतवणुकीपूर्वी काय लक्षात ठेवावं? : FD मध्ये गुंतवणूक करताना आपली गरज आणि कालावधीकडे लक्ष द्या. तुम्ही मध्ये पैसे काढावे लागले तर पेनल्टी लागू शकते. यामुळे दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य प्लॅनिंग करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
SBI मध्ये 1 लाख जमा केल्यास मिळेल 52,991 रुपयांचं बंपर व्याज! तेही सरकारी गॅरंटीसह
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल