Mutual Fund Rule Change: Mutual Fund ग्राहकांसाठी महत्त्वाची अपडेट, सेबीकडून नियमात बदल
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
म्युच्युअल फंड खात्यासाठी सेबीने KYC प्रक्रिया बंधनकारक केली असून 14 नोव्हेंबरपर्यंत अंतिम निर्णय अपेक्षित आहे. अपडेट्स SMS आणि ई मेलद्वारे मिळणार आहेत.
advertisement
1/7

फसवणूक टाळण्यासाठी आजकाल सगळ्या अॅपवर किंवा वेबसाइटवर E KYC करणं बंधनकारक आहे. म्युच्युअल फंड वापरणाऱ्या किंवा नव्याने उघडणाऱ्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण किंवा इतर सरकारी योजनांप्रमाणेच म्युच्युअल फंड धारकांना देखील पुन्हा KYC करणं बंधनकारक आहे. जर KYC केलं नाही तर त्यांचं खातं चालू राहणार नाही.
advertisement
2/7
म्युच्युअल फंड अकाउंट उघडण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. KYC प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय आता खातं उघडता येणार नाही. संपूर्ण डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे. याबाबत नुकताच प्रस्ताव सादर करण्यात आला असून लवकरच सेबीकडून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
advertisement
3/7
केवायसीला मंजुरी मिळाल्यानंतरच म्युच्युअल फंड खातं सुरू करता येईल. याचे अपडेट्स ग्राहकांना SMS आणि ई मेलद्वारे मिळणार आहेत. 14 नोव्हेंबरपर्यंत याबाबत अंतिम निर्णय होणार असून त्यामुळे गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढणार आहे.
advertisement
4/7
सध्या म्युच्युअल फंड खातं उघडण्यासाठी KYC आवश्यक आहे. मात्र काही अॅप किंवा बँका किंवा संस्था KYC प्रक्रिया पूर्ण न होऊ देताच ग्राहकांना खातं उघडण्याची परवानगी देतात. त्यामुळे गुंतवणूकदारांनाही काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय फसवणुकीचे प्रमाण देखील वाढत आहे. या सगळ्यावर तोडगा काढण्यासाठी सेबी कठोर भूमिका घेण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
चुकीचे KYC किंवा अर्धवट KYC प्रक्रिया केल्यास खात्यावरुन देवाण घेवाण करता येणार नाही. ग्राहकांना म्युच्युअल फंड जिथे खातं उघडायचं तिथे सगळे कागदपत्र सादर करणं आवश्यक आहे. KYC चे अपडेट कंपनीकडून जारी केले जातील, प्रक्रिया पूर्ण झाल्याचा मेल येईल आणि त्यानंतर खातं सुरू होईल.
advertisement
6/7
खातं उघडल्यापासून ते प्रत्येक गुंतवणूक करण्यापर्यंत सगळे अपडेट ई मेल किंवा SMS वर द्यावी लागणार आहे. एनएफओशी निगडीत 30 दिवसांमध्ये गुंतवणूक करणं आवश्यक आहे. जर तसं झालं नाही गुंतवणूकदार थेट पैसे काढू शकतात. जोखीम, फी, रणनिती स्पष्टपणे सांगणं आवश्यक असेल.
advertisement
7/7
प्रत्येक फंडची जोखीम किती आहे याची अपडेट महिन्याच्या शेवटी समजायची ती आता महिन्याच्या 15 तारखेलाच ग्राहकांना उपलब्ध करुन द्यावी लागणार आहे. हे नियम ग्राहकांच्या हिताचे आणि फायद्याचे आहेत असं यावरुन तरी स्पष्ट होत आहे. हे नियम कधीपासून बदलणार याची अपडेट समोर आली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Mutual Fund Rule Change: Mutual Fund ग्राहकांसाठी महत्त्वाची अपडेट, सेबीकडून नियमात बदल