Success Story : उच्चशिक्षित तरुणाचे दाल खिचडी सेंटर, महिन्याला 3 लाखांची करतोय उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Mohan Najan
Last Updated:
उच्चशिक्षित तरुण शैलेश कांदे हे देवराज या नावाचे दाल खिचडी नाश्ता सेंटर चालवतात. हातगाडीवर दाल खिचडी बनवण्याचे आणि ग्राहकांना विक्री करण्याचे काम कांदे हे करत आहेत.
advertisement
1/5

छत्रपती संभाजीनगर येथील सूतगिरणी चौकात उच्चशिक्षित तरुण शैलेश कांदे हे देवराज या नावाचे दाल खिचडी नाश्ता सेंटर चालवतात. हातगाडीवर दाल खिचडी बनवण्याचे आणि ग्राहकांना विक्री करण्याचे काम कांदे हे करत आहेत. दाल खिचडीचे वेगवेगळे प्रकार या नाष्टा सेंटरवर चाखायला मिळतात.
advertisement
2/5
एक प्लेट दाल खिचडीची 50 रुपयांना येथे मिळते. चविष्ट असलेली दाल खिचडी खाण्यासाठी दुरून लोक त्यांच्याकडे येतात. दाल खिचडी व्यवसायाच्या माध्यमातून कांदे यांची महिन्याला 3 लाखांची उलाढाल होते, तर खर्च वजा करून 80 ते 90 हजार रुपये नफा मिळत असल्याचे शैलेश कांदे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
3/5
शैलेश कांदे यांच्या देवराज दाल खिचडी सेंटरवर जिरा बटर दाल खिचडी, तडका दाल खिचडी, आचारी दाल खिचडी, दाल मखनी खिचडी यासह विविध प्रकारचे खिचडीमधील प्रकार या ठिकाणी मिळतात. विशेषतः या खिचडीमध्ये शुद्ध तूप वापरण्यात येते, तसेच दाल खिचडी प्लेट पन्नास रुपयांना मिळते आणि या एका प्लेटमध्ये एक जण एका वेळेला पोट भरून खाऊ शकतो, असे देखील कांदे यांनी म्हटले आहे.
advertisement
4/5
दाल खिचडी खाण्यासाठी खवय्ये छत्रपती संभाजीनगरसह, बीड, अंबाजोगाई, बुलढाणा, चिखली यासह संपूर्ण मराठवाड्यातून ग्राहक या खिचडीची चव चाखण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात. तसेच रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या पेशंटला सुद्धा खिचडी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बनवून दिली जाते. सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत हे नाश्ता सेंटर सुरू राहते. दिवसभरामध्ये 13 किलो राईस आणि 8 किलो डाळ येथे वापरण्यात येते.
advertisement
5/5
दाल खिचडी व्यवसाय असो किंवा इतर व्यवसाय, नवीन व्यावसायिकांनी व्यवसाय क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या सर्वांनी नेहमी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, स्वतःला अनुभव पाहिजे तसेच दर्जेदारपणा आणि पोट भरून खाता येईल अशा पद्धतीने नियोजन जर केले तर नक्कीच व्यवसायामध्ये यश मिळते, असे देखील कांदे यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Success Story : उच्चशिक्षित तरुणाचे दाल खिचडी सेंटर, महिन्याला 3 लाखांची करतोय उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र