TRENDING:

India EU Trade Deal : युरोपसोबतच्या करारानं 'या' ३ सेक्टरमधील शेअर्स सुसाट, एका दिवसात कोट्यवधींची कमाई

Last Updated:
शेअर बाजारात 'सुवर्णकाळ'! भारत-EU महाकरारामुळे गुंतवणूकदार मालामाल; 'या' ३ क्षेत्रांतील शेअर्सनी मारली मोठी झेप
advertisement
1/5
युरोपसोबतच्या करारानं 'या' ३ सेक्टरमधील शेअर्स सुसाट,एक दिवसांत कोट्यवधींचा नफा
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या कराराला 'मदर ऑफ ऑल डील्स' म्हटले आहे, त्या भारत-युरोपियन युनियन (EU) कराराची घोषणा होताच आज भारतीय शेअर बाजारात उत्साहाचे उधाण आले. या करारामुळे भारतीय कंपन्यांना युरोपची अवाढव्य बाजारपेठ खुली होणार असल्याने गुंतवणूकदारांनी फार्मा, टेक्सटाइल आणि केमिकल क्षेत्रातील शेअर्सची तुफान खरेदी केली आहे.
advertisement
2/5
युरोपमध्ये भारतीय कापडाला मोठी मागणी आहे, पण आतापर्यंत त्यावर जास्त आयात शुल्क (Duty) द्यावे लागत होते. या करारानंतर हे शुल्क कमी होणार असल्याने केपीआर मिल वेलस्पन लिविंग आणि नितिन स्पिनर्स यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. युरोपच्या बाजारपेठेत आता 'मेड इन इंडिया' कपड्यांची धूम असेल, या आशेने हे शेअर्स चमकले आहेत.
advertisement
3/5
भारतीय औषधे आणि रसायने यांच्यासाठी युरोप ही एक कठीण बाजारपेठ मानली जाते. मात्र, मुक्त व्यापार करारामुळे नियमावली सुटसुटीत होणार असून भारतीय कंपन्यांची विक्री वाढणार आहे. यामुळे या दोन्ही क्षेत्रांतील दिग्गज शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी मोठी खरेदी केली आहे.
advertisement
4/5
सध्या भारताच्या एकूण निर्यातीपैकी १७ टक्के हिस्सा युरोपला जातो. नामवंत ब्रोकरेज फर्म 'एमके ग्लोबल' च्या मते, या करारामुळे भारताची युरोपमधील निर्यात ५० अब्ज डॉलर्सने (सुमारे ४ लाख कोटी रुपये) वाढू शकते. ही वाढ विशेषतः मध्यम-तंत्रज्ञान उत्पादन क्षेत्रात दिसून येईल.
advertisement
5/5
विश्लेषकांच्या मते, हा करार दीर्घकालीन असून यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत डॉलरचा ओघ वाढेल. बाजारात सध्या असलेल्या अस्थिरतेच्या काळात या 'मदर ऑफ ऑल डील'ने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमालीचा वाढवला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/Share Market/
India EU Trade Deal : युरोपसोबतच्या करारानं 'या' ३ सेक्टरमधील शेअर्स सुसाट, एका दिवसात कोट्यवधींची कमाई
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल