RBI च्या निर्णयाचा शेअर मार्केटवर परिणाम, बँकेसह या सेक्टर्सच्या शेअर्समध्ये तेजी
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
बँकिंग सेक्टरमध्ये देखील आज चांगली रिकव्हरी पाहायला मिळाली आहे. बँक निफ्टी आता 51, 132 अंकांवर आहे. 0.28 टक्क्यांची वाढ पाहायला मिळत आहे.
advertisement
1/7

मुंबई : मागच्या दोन दिवसांत शेअर मार्केट कोसळलं होतं. आता शेअर मार्केट रिकव्हर व्हायला सुरुवात झाली आहे. आरबीआयने आज रेपो रेट जाहीर केला आहे. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये बँक निफ्टी रिकव्हर होताना दिसत आहे. बँकेच्या शेअर्समध्ये तेजी दिसत आहे. RBI ने रेपो रेट 6.75% कायम ठेवला आहे. रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नाही.
advertisement
2/7
सेन्सेक्स 400 अंकांच्या वाढीसह 82,080.11 वर आहे. आज मार्केट रिकव्हर होत असल्याने गुंतवणूकदारांना थोडा दिलासा मिळाला आहे. मागच्या सहा दिवसात जवळपास गुंतवणूकदारांचे 26 लाख कोटी पातळीवर व्यवहार करताना दिसला. तर निफ्टी 25,148.90 वर दिसला.
advertisement
3/7
Torrent Power शेअर 9 टक्क्यांनी वधारला आहे. कंपनी को महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड (MSEDCL)कडून 2000 मेगावॅट एनर्जी स्टोअरेज आणि लाँग टर्म सप्लाय करण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याने ह्या शेअर्समध्ये तेजी आल्याचं पाहायला मिळालं.
advertisement
4/7
खाद्यतेल, मेटलचे दर वाढल्याने कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आहेच. येत्या काळात हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईमुळे कंपनीच्या शेअर्समध्ये त्याचे परिणाम दिसू शकतात.
advertisement
5/7
कॅपिटल गुड्स, रियल्टी आणि फार्मा सेक्टरमध्ये आज तेजी पाहायला मिळत आहे. ABB कंपनीच्या शेअर्सच्या किमती 5 टक्क्यांनी वधारल्या आहेत.
advertisement
6/7
बँकिंग सेक्टरमध्ये देखील आज चांगली रिकव्हरी पाहायला मिळाली आहे. बँक निफ्टी आता 51, 132 अंकांवर आहे. 0.28 टक्क्यांची वाढ पाहायला मिळत आहे. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये बँकेच्या शेअर्सच्या किमती कमी झाल्या असल्या तरी आता रिकव्हर व्हायला सुरुवात झाली आहे.
advertisement
7/7
(डिस्क्लेमर: इथे दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहिती आणि ब्रोकरेजच्या मतावर आधारीत आहे. . कोणतंही नुकसान किंवा फसवणूक झाल्यास न्यूज18 मराठी जबाबदार राहणार नाही. गुंतवणुकीआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/Share Market/
RBI च्या निर्णयाचा शेअर मार्केटवर परिणाम, बँकेसह या सेक्टर्सच्या शेअर्समध्ये तेजी