TRENDING:

Share Market: 3 दिवसाच्या सुट्टीनंतर Share Market मध्ये भूकंप, दणादण आपटले शेअर्स

Last Updated:
Share Market: शेअर मार्केट 1100 अंकांनी कोसळलं आहे. निफ्टी 24000 अंकांच्या खाली आली आहे. अमेरिकेच्या निवडणुका 5 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मार्केटवर दबाव आहे. याचा एक इफेक्टही आशियातील मार्केटवर पाहायला मिळाला आहे.
advertisement
1/7
3 दिवसाच्या सुट्टीनंतर Share Market मध्ये भूकंप, दणादण आपटले शेअर्स
मुहूर्त ट्रेडिंग वगळता शुक्रवार, शनिवार आणि रविवार शेअर मार्केट दिवाळीच्या सुट्टीनिमित्त बंद होतं. त्यानंतर आज सकाळी साडेनऊवाजता मार्केट उघडल्यानंतर प्रचंड दबाव आणि तणाव पाहायला मिळाला. शेअर मार्केटची सुरुवात अत्यंत वाईट झाली आहे. गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे.
advertisement
2/7
शेअर मार्केट 1100 अंकांनी कोसळलं आहे. निफ्टी 24000 अंकांच्या खाली आली आहे. अमेरिकेच्या निवडणुका 5 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मार्केटवर दबाव आहे. याचा एक इफेक्टही आशियातील मार्केटवर पाहायला मिळाला आहे.
advertisement
3/7
रियल्टी, मीडिया, ऑईल आणि गॅस शेअर्स दणादण कोसळले आहेत. INDEX INDIA VIX 6 टक्क्यांनी चढला आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप्ट शेअर्सवर त्याचा परिणाम सर्वात जास्त पाहायला मिळाला. या दोन्ही कॅटेगरीतले शेअर्स कोसळले आहेत.
advertisement
4/7
ऑक्टोबर महिन्यात शेअर मार्केट कोसळलं होते. तो रेकॉर्डही नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात आठवड्याच्या सुरुवातीला शेअर मार्केटनं तोडला आहे. तर निफ्टी तीन महिन्यातील निच्चांकी पातळीवर आहे.
advertisement
5/7
बँक निफ्टी आणि बँकेंच्या शेअर्सने मार्केटला तारलं आहे. IT, फार्मा कंपनी, बँक आणि स्पेस शेअर्समध्ये ज्यांनी गुंतवणूक केली आहे त्यांना फायदा मिळाला आहे.
advertisement
6/7
रियल्टी आणि सरकारी कंपन्यांमध्ये सर्वाधिक घसरण दिसून येत आहे. दोन्ही क्षेत्र निर्देशांक 2% पेक्षा जास्त घसरले आहेत. याशिवाय मेटल, कॅपिटल गुड्स आणि एफएमसीजी सेक्टरमध्येही एक टक्क्याहून अधिक घट झाली आहे.
advertisement
7/7
(शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं जोखमीचं आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. इथे दिलेली मतं ही ब्रोकरेज फर्मची वैयक्तिक मते आहेत. यासाठी वेबसाइट जबाबदार नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमचा आर्थिक सल्लागार किंवा प्रमाणित तज्ज्ञाचा सल्ला नक्की घ्या.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/Share Market/
Share Market: 3 दिवसाच्या सुट्टीनंतर Share Market मध्ये भूकंप, दणादण आपटले शेअर्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल