Share Market: शेअर मार्केटमध्ये स्थिती बिघडली, Stock विकायचे की ठेवायचे?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
सेबीचा निर्णय, इस्रायल-इराण संघर्ष आणि अस्थिर शेअर बाजार, भारतीय ट्रेडरला किती सतर्क राहायला हवं?
advertisement
1/7

इस्रायल आणि इराण संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. याआधी सेबीनं काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे गेल्या दोन तीन दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये अस्थिरता आणि दबाव वाढत आहे. आता जिओ पॉलिटिक्समुळे शेअर मार्केट अजून कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रेडर्स किंवा गुंतवणूकदारांनी काय करावं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला देणरा आहोत.
advertisement
2/7
अनुज सिंघल म्हणाले, संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी जर शेअर्स खरेदी केले तर त्यांना लाँग टर्ममध्ये फायदा होऊ शकतो. मागच्या 40-50 वर्षांतला इतिहास काढून पाहावा, जिओ पॉलिटिकल इम्पॅक्टमुळे जेव्हा शेअर मार्केट खाली येतं तेव्हा तुम्ही गुंतवणुकीवर भर द्यायला हवा.
advertisement
3/7
चांगल्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करा. पॅनिक होऊन तुमच्या हातातले स्टॉक्स विकू नका. शेअर मार्केटसध्या डाऊन असेल तर तुम्हाला गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य गुंतवणूक केली तर फायद्याचं ठरु शकतं असं अनुज सिंघल म्हणाले आहेत.
advertisement
4/7
मेटल शेअर्स खरेदी करावेत असं तज्ज्ञांचे म्हणणं आहे. क्रूड ऑईल, पेट्रोल कंपन्यांचे शेअर्स थोडे तेजीत असल्याचं दिसत आहे. निफ्टी मेटल सध्या पॉझिटिव्ह आहेत. ते विकायची गडबड करू नका असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
advertisement
5/7
सेबीचा निर्णय, इराण-इस्रायल संघर्ष आणि महापुरामुळे ग्रामीण भागातमध्ये झालेलं नुकसान यामुळे व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. ज्यांच्याकडे स्टॉक आहेत त्यांनी पॅनिक होऊन विकू नका. थोडं मार्केट स्थिर होण्याची वाट पाहावी असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
advertisement
6/7
शिवांगी यांच्या मते, सध्या स्थिती अस्थिर असल्याने कोणताही निर्णय घेणं रिस्क ठरु शकतं. त्यामुळे थोडं थांबणं फायद्याचं ठरेलं.
advertisement
7/7
निफ्टी बँक जवळपास 500 अंकांनी घसरून 52,400 च्या पातळीवर गेला. मिडकॅप निर्देशांकात सुमारे 650 अंकांची घसरण झाली. स्मॉलकॅपमध्येही सुमारे 250 अंकांची घसरण झाली. निफ्टीच्या ओपनिंग दरम्यान सर्व सेक्टर लाल रंगात होते. ऑटो सेक्टरचे शेअर्स जोरदार आपटल्याचं दिसत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/Share Market/
Share Market: शेअर मार्केटमध्ये स्थिती बिघडली, Stock विकायचे की ठेवायचे?