TRENDING:

Share Market: बजेटमुळे आज शेअर मार्केट सुरू राहणार, पण ट्रेडिंग करता येणार का?

Last Updated:
मुंबई शेअर बाजार आणि NSE आज रविवार असूनही पूर्णवेळ सुरू आहेत, अर्थसंकल्पाच्या घोषणांसाठी हा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला आहे. MCX, NCDEX देखील आज खुले आहेत.
advertisement
1/7
Share Market: बजेटमुळे आज शेअर मार्केट सुरू राहणार, पण ट्रेडिंग करता येणार का?
दरवर्षी अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजारात मोठी धाकधूक असते, पण यंदा हे बजेट खास आहे. कारण आज रविवार असूनही मुंबई शेअर बाजार (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) पूर्णवेळ सुरू राहणार आहेत.
advertisement
2/7
भारताच्या इतिहासात शेअर बाजार रविवारी सुरू राहण्याची ही केवळ दुसरीच वेळ आहे. अर्थमंत्र्यांच्या घोषणांवर गुंतवणूकदारांना 'रिअल टाईम'मध्ये व्यवहार करता यावेत, यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
3/7
आज जरी रविवार असला तरी बाजाराची वेळ नेहमीसारखीच असेल. सकाळी ९:०० ते ९:०८ या वेळेत 'प्री-ओपन' सत्र पार पडेल आणि ९:१५ वाजता प्रत्यक्ष व्यवहारांना सुरुवात होईल. दुपारी ३:३० वाजेपर्यंत बाजार सुरू राहील.
advertisement
4/7
केवळ शेअर्सच नाही, तर सोने-चांदी आणि शेतीमालाचे व्यवहार होणारे MCX आणि NCDEX हे बाजारही आज सुरू राहणार आहेत. MCX सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू असेल, तर NCDEX सकाळी १० वाजता उघडेल. त्यामुळे सोन्याच्या किमतीत बजेटमुळे काय बदल होतोय, याकडेही सर्वसामान्यांचे लक्ष असेल.
advertisement
5/7
तुम्ही शुक्रवारी (३० जानेवारी) खरेदी केलेले शेअर्स आज (रविवारी) विकू शकत नाही. तसेच आज खरेदी केलेले शेअर्स सोमवारी विकता येणार नाहीत. इक्विटी आणि F&O मध्ये इंट्राडे ट्रेडिंगला परवानगी आहे, मात्र नफा/तोटा सोमवारी सेटल होईल. बँका बंद असल्याने नियमित बँकिंग चॅनेलद्वारे पैसे येण्यास उशीर होऊ शकतो; व्यवहार सुरळीत करण्यासाठी UPI वापरण्याचा सल्ला दिला जातो.
advertisement
6/7
आजच्या व्यवहारांचे पैसे किंवा शेअर्सचे सेटलमेंट सोमवार, २ फेब्रुवारी २०२६ रोजी होईल. गुंतवणूकदारांनी अर्थसंकल्पाच्या घोषणेवेळी बाजारात होणाऱ्या संभाव्य चढ-उतारांची नोंद घेऊनच व्यवहार करावेत.
advertisement
7/7
गेल्या १५ वर्षांचा इतिहास पाहिला तर बजेटच्या दिवशी बाजार सरासरी फक्त ०.१९% हलतो, म्हणजेच फार मोठी उलथापालथ होत नाही. मात्र, यंदा गुंतवणूकदारांच्या अपेक्षा 'म्युटेड' (साध्या) आहेत. सरकार पायाभूत सुविधा, संरक्षण, आणि अक्षय ऊर्जा, क्षेत्रासाठी मोठ्या तरतुदी करेल, अशी आशा आहे. जर सरकारने कोणताही नकारात्मक 'सरप्राईज' दिला नाही, तर बाजार स्थिर राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/Share Market/
Share Market: बजेटमुळे आज शेअर मार्केट सुरू राहणार, पण ट्रेडिंग करता येणार का?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल