TRENDING:

Share Market: विजेच्या वाढत्या मागणीतून कमवा पैसे, या शेअर्समध्ये येणार तुफान तेजी

Last Updated:
येत्या काळात विजेची मागणी वाढणार आहे. मेट्रो, मोनो, विजेवर चालणाऱ्या ट्रेन आणि इलेक्ट्रिक बस, इतकंच नाही तर विजेचा वापरही ग्राहकांचा वाढत आहे. त्यामुळे वाढती मागणी लक्षात घेऊन तुम्ही यातून पैसे कमवू शकता.
advertisement
1/7
विजेच्या वाढत्या मागणीतून कमवा पैसे, या शेअर्समध्ये येणार तुफान तेजी
शेअर मार्केटने आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडले आहेत. मंगळवारी शेअर मार्केट 85 हजार अंकांवर पोहोचलं होतं. हा नवीन उच्चांक गाठला आहे. मेटल, गॅस आणि ऑईल कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसत आहे.
advertisement
2/7
येत्या काळात विजेची मागणी वाढणार आहे. मेट्रो, मोनो, विजेवर चालणाऱ्या ट्रेन आणि इलेक्ट्रिक बस, इतकंच नाही तर विजेचा वापरही ग्राहकांचा वाढत आहे. त्यामुळे वाढती मागणी लक्षात घेऊन तुम्ही यातून पैसे कमवू शकता.
advertisement
3/7
ग्रीन एनर्जी आणि इलेक्ट्रिसिटी तयार करणाऱ्या कंपन्या अगदी सोलारकंपन्यांचे शेअर्सही आगामी काळात तुम्हाला चांगला नफा कमावून देऊ शकणार आहेत. मात्र यामध्ये गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
advertisement
4/7
मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार ब्रोकरेजच्या मते, येत्या 10 वर्षांत देशातील विजेचा वापर वार्षिक 7 टक्क्यांपेक्षा जास्त दराने वाढण्याची शक्यता आहे. ज्याला मजबूत GDP वाढ, इलेक्ट्रिक वाहने (EVs) आणि डेटा सेंटर्सद्वार्ससाठीही इलेक्ट्रीसिटीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाणार आहे.
advertisement
5/7
साधारण 2035 पासून, विजेच्या मागणीपैकी एक तृतीयांश मागणी फक्त ईव्ही आणि डेटा सेंटर्सकडून होईल. डेटा सेंटरची क्षमता वार्षिक 30 टक्के दराने वाढू शकते आणि ईव्हीची मागणीही वाढणार आहे. तज्ज्ञांच्या मते, वाढती मागणी, जुन्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण वाढणाऱ्या ऊर्जा स्त्रोतांकडे वळणे यामुळे ऊर्जा क्षेत्रात 40 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्याची संधी आहे.
advertisement
6/7
2030 पर्यंत 500 GW नवीकरणीय ऊर्जा क्षमतेचे लक्ष्य गाठण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने या क्षेत्रातील काही शेअर्समध्ये गुंतवणूक करावी ते शेअर्स कोणते असतील याचा अंदाज आणि आपले रेटिंग दिले आहेत.
advertisement
7/7
पावर ग्रीड, जेएसडब्लू एनर्जी, टाटा पावर, या तीन शेअर्समध्ये आगामी काळात मोठी कमाई गुंतवणूकदार करू शकतात. पुढच्या दीड वर्षात याचा ग्रोथ रेट 2.4 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. NTPC ग्रीन एनर्जी कंपनी आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत. IEX मध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर ती लाँग टर्मसाठी केल्यास फायदा होऊ शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/Share Market/
Share Market: विजेच्या वाढत्या मागणीतून कमवा पैसे, या शेअर्समध्ये येणार तुफान तेजी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल