Money : 10 लाख एकदाच फिक्स डिपॉझिटमध्ये टाकावं की 1 लाख 10 वेगवेगळ्या FD मध्ये टाकावं? कशामध्ये आहे जास्त फायदा?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
सुरक्षितता, खात्रीशीर परतावा आणि हाताळायला सोपी, यामुळे एफडी हा आपल्या घरातील गुंतवणुकीचा अविभाज्य भाग आहे. पण, जेव्हा आपल्याकडे मोठी रक्कम येते. त्यावेळी कुठे आणि कसे पैसे गुंतवायचे असा प्रश्न अनेकांना पडतो
advertisement
1/10

आपण भारतीय लोक गुंतवणुकीच्या बाबतीत थोडे 'सेफ' खेळायला पहातो. शेअर मार्केटमध्ये कितीही तेजी असली, तरी आजही मध्यमवर्गीय नोकरी करणारा माणूस आणि ज्येष्ठ नागरिकांचा सर्वात जास्त विश्वास कशावर असेल, तर तो म्हणजे बँक फिक्स्ड डिपॉझिट (FD). सुरक्षितता, खात्रीशीर परतावा आणि हाताळायला सोपी, यामुळे एफडी हा आपल्या घरातील गुंतवणुकीचा अविभाज्य भाग आहे. पण, जेव्हा आपल्याकडे मोठी रक्कम येते. त्यावेळी कुठे आणि कसे पैसे गुंतवायचे असा प्रश्न अनेकांना पडतो.
advertisement
2/10
समजा एखाद्याकडे 10 लाख रुपये आहेत, तेव्हा मनात एक मोठा प्रश्न उभा राहतो. हे 10 लाख रुपये एकदाच एकाच एफडीमध्ये टाकावेत की त्याचे छोटे छोटे भाग करून वेगवेगळ्या बँकांमध्ये किंवा वेगवेगळ्या एफडीमध्ये गुंतवावेत? हा प्रश्न वरवर साधा वाटत असला, तर याचे उत्तर तुमच्या भविष्यातील 'कॅश फ्लो' आणि 'टॅक्स प्लॅनिंग'वर मोठा परिणाम करू शकते.
advertisement
3/10
गणित काय सांगतं? एकदाच गुंतवणूक की तुकड्यांमध्ये?समजा तुमच्याकडे 10 लाख रुपये आहेत आणि बँकेचा व्याजदर 7% आहे. जर तुम्ही पूर्ण रक्कम 10 वर्षांसाठी एकाच एफडीमध्ये ठेवली, तर तुम्हाला मिळणारा परतावा आणि याच रकमेचे 10 भाग करून 10 वेगवेगळ्या एफडीमध्ये 7% दराने ठेवले, तर मिळणारा परतावा सारखाच असतो. गणिताच्या भाषेत सांगायचं तर, एकूण मॅच्युरिटी रक्कम दोन्ही परिस्थितीत समान असेल.
advertisement
4/10
पण, खरा फरक पडतो तो गरजेच्या वेळी आणि सुरक्षिततेच्या बाबतीत. चला समजून घेऊया दोन्ही पद्धतींचे फायदे आणि तोटे.
advertisement
5/10
10 लाखांची एकच एफडी करण्याचे धोके (Lump Sum FD)जर तुम्ही 10 लाखांची एकच एफडी केली, तर ती मॅनेज करायला खूप सोपी वाटते. एकाच पावतीवर लक्ष ठेवणं सोपं असतं. पण, यात दोन मोठे धोके आहेत:
advertisement
6/10
वेळेपूर्वी पैसे काढल्यास दंड (Premature Withdrawal Penalty): समजा, तुम्हाला अचानक 50 हजार रुपयांची गरज पडली. अशा वेळी तुम्हाला 10 लाखांची पूर्ण एफडी मोडावी लागेल. बँक त्यावर दंड आकारते आणि तुम्हाला मिळणारा व्याजदरही कमी होतो. 50 हजारांच्या गरजेसाठी तुम्हाला उर्वरित 9.50 लाखांच्या व्याजावरही पाणी सोडावे लागते.
advertisement
7/10
दुसरा एक तोटा असा की आरबीआयच्या नियमानुसार, जर बँक बुडाली किंवा आर्थिक संकटात आली, तर तुमच्या केवळ 5 लाख रुपयांपर्यंतच्याच रकमेला विम्याचे संरक्षण असते. म्हणजे 10 लाख एकाच बँकेत असतील, तर वरचे 5 लाख धोक्यात येऊ शकतात.
advertisement
8/10
1 लाखाच्या 10 वेगवेगळ्या एफडी: हा आहे 'स्मार्ट' मार्गअनेक अनुभवी गुंतवणूकदार आपली मोठी रक्कम विभागून (Split FD) ठेवण्याचा सल्ला देतात. याचे फायदे अनेक आहेत:लिक्विडिटी (पैसे उपलब्ध असणे): जर तुम्हाला पैशांची तातडीची गरज पडली, तर तुम्ही फक्त 1 लाखाची एक किंवा दोनच एफडी मोडू शकता. उर्वरित 8-9 लाखांवर तुम्हाला पूर्ण दराने व्याज मिळत राहते.
advertisement
9/10
विविध बँका आणि व्याजदर: तुम्ही हे 10 लाख वेगवेगळ्या बँकांमध्ये विभागून ठेवू शकता. यामुळे एखाद्या बँकेत जास्त व्याज मिळत असेल, तर त्याचा फायदा घेता येतो. 10 लाख रुपये 2-3 वेगवेगळ्या बँकांमध्ये विभागल्यास, प्रत्येक बँकेतील 5 लाखांपर्यंतची तुमची रक्कम विम्यामुळे पूर्णपणे सुरक्षित राहते.
advertisement
10/10
टॅक्स प्लॅनिंगमध्येही फायदाजेव्हा तुम्ही एफडीचे तुकडे करता, तेव्हा तुम्ही 'टीडीएस' (TDS) वाचवण्यासाठीही नियोजन करू शकता. ज्येष्ठ नागरिकांसाठी हे विशेषतः फायदेशीर ठरते. जर तुमच्याकडे मोठी रक्कम असेल, तर ती एकाच एफडीमध्ये 'लॉक' करण्यापेक्षा तिचे 5 ते 10 तुकडे करणे केव्हाही शहाणपणाचे ठरते. यामुळे तुम्हाला गरजेच्या वेळी पैसे मिळतात, दंड कमी भरावा लागतो आणि तुमची गुंतवणूक अधिक सुरक्षित राहते. गुंतवणुकीचे हे 'लेडरिंग' (Laddering) तंत्र वापरून तुम्ही तुमच्या पैशांचे व्यवस्थापन अधिक सक्षमपणे करू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Money : 10 लाख एकदाच फिक्स डिपॉझिटमध्ये टाकावं की 1 लाख 10 वेगवेगळ्या FD मध्ये टाकावं? कशामध्ये आहे जास्त फायदा?