चांदीचा भाव 10 लाख रुपये किलो होणार आहे? किती खरा आहे हा दावा
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
बँक ऑफ अमेरिकाचे एक्सपर्ट मायकल विडमर यांनी 2026 साठी अंदाज लावला की, चांदीची किंमत 135 डॉलरवरुन 309 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकते. सर्वात जास्त तेजीचा केस (309 $/oz) सत्य झाला तर भारतात चांदीचा भाव जवळपास 10 लाख रुपये प्रति किलोग्रामपर्यंत जाऊ शकतो.
advertisement
1/7

नवी दिल्ली : बाजारातील जानकार आणि गुंतवणूकदारांमध्ये सध्या एका बातमी धुमाकूळ घातला आहे. बँक ऑफ अमेरिकाचे कमोडिटी स्ट्रॅटिजिस्टमध्ये मायकल विडमर यांनी अंदाज लावला आहे की, वर्ष 2026 पर्यंत चांदीच्या किंमतीत ऐतिहासिक वाढ होऊ शकते.जर त्यांच्या सर्वोच्च अंदाजावर (उच्च केस) विश्वास ठेवायचा असेल, तर भारतात 1 किलो चांदीची किंमत प्रति किलो 10 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
advertisement
2/7
सध्या बाजारात सोने-चांदीच्या किंमतींमध्ये किरकोळ घसरण पाहायला मिळाली आही. इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशन म्हणजेच आयबीजेएनुसार 20 फेब्रुवारीला 24 कॅरेट सोनं 132 रुपये स्वस्त होऊन जवळपास 1.54 लाख रुपये प्रति 10 ग्रामवर आलंय. तर चांदी 792 रुपयांनी कोसळून जवळपास 2.45 लाख रुपये प्रति किलोग्रामवर पोहोचली आहे.
advertisement
3/7
एक्सपर्ट्सनुसार, चांदीची मागणी वाढण्याचे 3 मुख्य कारण आहेत. यामध्ये पुरवढ्यात कमतरता एक कारण आहे. बाजारात चांदीची उपलब्धता ही मागणीपेक्षा कमी आहे.यासोबतच सोलर पॅनल आणि इलेक्ट्रिक गाड्या म्हणजेच ईव्हीच्या निर्मितीमध्ये चांदीचा वापर खुप तेजीने वाढतोय.मोठ्या गुंतवणूकदारांनी चांदीत गुंतवणूक सुरु केली तर किंमती या खुप वर जाऊ शकतात.
advertisement
4/7
भाव 10 लाखांपर्यंत कसा पोहोचेल? : ग्लोबल मार्केटमध्ये चांदी $309 प्रति औंसवर पोहोचली तर भारतात याची किंमत $309 लगभग 26,265 रुपये (प्रति औंस) असेल. किलोग्रामध्ये भाव जवळपास 8,44,500 रुपये असेल. यामध्ये 15% इंपोर्ट ड्यूटी, 3% GST आणि मेकिंग चार्ज जोडल्यानंतर एकूण किंमत 10,05,000 रुपये प्रति किलोग्रामच्या जवळपास जाते.
advertisement
5/7
हे फिक्स आहे का? : नाही हा फक्त एक 'एक्सट्रीम' म्हणजेच सर्वात उंच अंदाज आहे. एक्सपर्टने 3 स्थिती सांगितल्या आहेत. बेस केस म्हणजे भाव 4.40 लाख रुपये प्रति किलोपर्यंत, मिड केस म्हणजेच भाव 6.50 लाख रुपये प्रति किलोपर्यंत, हाय केस म्हणजेच भाव 10 लाख प्रति किलोपर्यंत.
advertisement
6/7
भारतात चांदीचे भाव अनेक फॅक्टर मिळून ठरते. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजाराच्या किंमती, डॉलर-रुपया एक्सचेंज रेट, इंपोर्ट ड्यूटी आणि टॅक्स, डिमांड आणि सप्लाय, लोकल मार्केट प्रीमियम.
advertisement
7/7
देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये चांदीची किंमत थोडी वेगळी असू शकते. यामध्ये ट्रान्सपोर्ट, स्टोरेज, ज्वेलर्सचा मार्जिंन आणि लोकल डिमांडचा परिणाम दिसतो. भारतात रोज सोनं-चांदीच्या किंमती जारी करण्यात इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशन सारख्या संस्थांची भूमिका महत्त्वाची असते.