Silver Price: OMG! स्टॉक, म्युच्युअल फंड विसराल, सोन्यापेक्षा चांदीने केलं मालामाल, आणखी किती वाढणार दर?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मागील सहा महिन्यात सोनं २४ हजारांनी वाढलं असताना, चांदीने अधिक नफा दिला आहे. चांदीचे दर १ लाख १८ हजारांवर पोहोचले असून, दिवाळीपर्यंत १ लाख २५ हजार होण्याची शक्यता आहे.
advertisement
1/8

टॅरिफमुळे सोन्या चांदीच्या दरावर दबाव वाढला आहे. मागच्या सहा महिन्यात जवळपास 24 हजार रुपयांनी सोनं वाढलं आहे. पण तुमचा विश्वास बसणार नाही सोन्यापेक्षा जास्त नफा चांदीने दिला आहे. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि सोन्यापेक्षा जास्त रिटर्न चांदीने दिले आहेत.
advertisement
2/8
चांदीचे एक किलो 999 शुद्ध कॅरेटचे दर 1 लाख 17 हजार 837 रुपये आहेत. तर GST सह हेच दर 1 लाख 18 हजार 90 रुपयांवर पोहोचले आहेत. येत्या काळात चांदी आणखी महाग होण्याची शक्यता आहे.
advertisement
3/8
गुरुवारी 7 ऑगस्ट रोजी चांदीचे दर पुन्हा एकदा हजार रुपयांनी महाग झाले आहेत. चांदीचा वापर उपकरणं, गाड्या, इत्यादींसाठी वापरला जातो. त्यामुळे येत्या काळात हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
4/8
टॅरिफचा दबाव, वाढणारी मागणी, यामुळे चांदीचे दर वाढत आहेत. मागच्या 6 महिन्यात सोनं २४ हजारने झपाट्याने वाढलं पण त्याहीपेक्षा जास्त चांदीची दरवाढ झाली. जिथे सोनं 1 लाख 4 हजारवर आहे तर त्याच वेळी चांदी किलोमागे 1 लाख 18 हजारवर पोहोचली आहे.
advertisement
5/8
मागच्या 14 वर्षात चांदीने दिलेले हे सर्वोच्च रिटर्न्स असल्याचं मागलं जात आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणारेही आता चांदी घेण्याकडे वळत आहेत. भविष्यात चांदी देखील सोन्याच्या मार्गावर येईल अशी आशा आहे.
advertisement
6/8
चांदीची आयात करणाऱ्या अमरपाली ग्रुपचे सीईओ चिराग ठक्कर म्हणतात की, गुंतवणूक आणि औद्योगिक गरजांमुळे चांदीची मागणी सतत वाढत आहे. उद्योगांमध्ये, सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांमध्ये याचा सर्वाधिक वापर केला जातो.
advertisement
7/8
चांदीचे दर 1 लाख 20 हजारपर्यंत जातील असा अंदाज होता, मात्र हे दर ऑगस्ट महिन्यातच 1 लाख 20 हजारवर जाण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत हे दर 1 लाख 25 हजारकडे जाऊ शकतात आणि वर्षाअखेरपर्यंत 1 लाख 27 हजारच्या आसपास जाऊ शकतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
advertisement
8/8
आता गुंतवणूक करताना सिल्वर ETF, चांदीचे नाणे, चांदीचे बिस्कीट असे खरेदी करावेत. त्याचा येत्या काळात दुप्पट फायदा होऊ शकतो. मार्केटमध्ये जिथे सोनं 5-10 टक्के रिटर्न देतं तिथे 21 टक्के रिटर्न्स चांदी देते त्यामुळे लोक चांदी खरेदीकडे वळत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Silver Price: OMG! स्टॉक, म्युच्युअल फंड विसराल, सोन्यापेक्षा चांदीने केलं मालामाल, आणखी किती वाढणार दर?