TRENDING:

Silver Rate: ... म्हणून New Year ला 200000 रुपयांवर जाणार चांदी, एक्सपर्टची सर्वात मोठी भविष्यवाणी

Last Updated:
चांदीच्या दरात आठवड्यात २० हजार ५७० रुपयांची वाढ, एक्सपोर्ट्सनुसार २०२६ मध्ये दर दोन लाख रुपये प्रति किलो होण्याची शक्यता; चेतन राजपूरेकर यांचा जागतिक कारणांचा उल्लेख.
advertisement
1/6
... म्हणून New Year ला 200000 रुपयांवर जाणार चांदी, एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
दिवाळीनंतर सोने आणि चांदीच्या दरांना काहीसा ब्रेक लागल्यामुळे ग्राहकांमध्ये थोडा दिलासा मिळाला होता. मात्र डिसेंबर सुरू झाला तसं पुन्हा एकदा चांदी सुस्साट पळायला सुरू झाली आहे. पुन्हा एकदा सुसाट वेग पकडल्याने ग्राहकांचा क्षणिक आनंद दूर झाला आहे. विशेषतः चांदीच्या दराने तर मोठी झेप घेतली असून, सरासरी दररोज तीन हजार रुपयांची वाढ नोंदवली जात आहे. चांदीच्या या वेगामुळे, येत्या नवीन वर्षात (२०२६ मध्ये) चांदीचा दर दोन लाख रुपये प्रति किलोचा टप्पा गाठेल असा एक्सपोर्ट्सचा दावा आहे.
advertisement
2/6
सराफ व्यावसायिक चेतन राजपूरेकर यांच्या मते, या दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय कारणे प्रामुख्याने कारणीभूत आहेत. अमेरिकेतील वाढलेली महागाई आणि बेरोजगारी, चीनकडून चांदीची जोरदार खरेदी, तसेच जगातील अनेक भागांत सुरू असलेली युद्धजन्य परिस्थिती यांसारख्या जागतिक घडामोडींमुळे सोने आणि चांदीचे दर आगामी काळात सातत्याने वाढत राहण्याची शक्यता आहे.
advertisement
3/6
अमेरिकेकडून अर्थ आणि उद्योग क्षेत्रात उचलली जाणारी पाऊलेही मोलाच्या धातूंच्या दरात वाढ घडवून आणत आहेत. चांदीच्या दरातील ही वाढ किती झपाट्याने झालीय हे मागील काही दिवसांतील आकडेवारीवरून स्पष्ट होते. २६ नोव्हेंबर रोजी चांदीचा जीएसटीसह प्रति किलो दर १ लाख ६५ हजार ४३० रुपये इतका होता. अवघ्या आठवडाभरात, बुधवार (दि. ३) पर्यंत हा दर थेट २ लाख ५६ हजार ५०० रुपयांवर पोहोचला आहे.
advertisement
4/6
फक्त एका आठवड्यात चांदीच्या दरात तब्बल २० हजार ५७० रुपयांची मोठी वाढ नोंदवली गेली आहे. दिवाळी धनत्रयोदशीच्या 12 ऑक्टोबर रोजी असलेला १ लाख ७४ हजार ७०० रुपयांचा दर दिवाळीनंतर कमी झाला होता, पण आता पुन्हा एकदा दराने वेग पकडला आहे. चांदीसोबतच सोन्याचे दरही चांगल्याच वेगाने वाढत आहेत. २४ कॅरेट सोन्याच्या दराने मोठी झेप घेतली आहे.
advertisement
5/6
२६ नोव्हेंबर रोजी जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १ लाख ३० हजार ४०० रुपये होता. बुधवारपर्यंत हा दर थेट १ लाख ३८ हजार रुपयांवर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे, २२ कॅरेट सोनेही २६ नोव्हेंबरला प्रति तोळा १ लाख ३० हजार १० रुपये होते, ते बुधवारपर्यंत १ लाख ३१ हजार ३६० रुपयांवर पोहोचले आहे.
advertisement
6/6
सोन्या-चांदीच्या बाजारातील हंगामी चढ-उतार पाहता, सराफ व्यावसायिकांना नववर्षात दरात आणखी तीव्र वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थिरता आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून मौल्यवान धातूंना मिळणारी पसंती यामुळे दर वाढत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी सध्याची वाढ लक्षात घेऊन, भविष्यातील दरवाढीसाठी मानसिक तयारी करणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Silver Rate: ... म्हणून New Year ला 200000 रुपयांवर जाणार चांदी, एक्सपर्टची सर्वात मोठी भविष्यवाणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल