TRENDING:

Home Loan vs SIP: होम लोन घेऊन 53,984 रुपयांचा EMI भरावा की SIP करावी, कोणता पर्याय फायद्याचा?

Last Updated:
घराचे भाव भविष्यात किती वाढतील याबाबत खात्री देता येत नाही.शेअर बाजारातून मिळणाऱ्या परताव्यावरही हमी नसते. त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी जोखीम समजून घ्यावी.
advertisement
1/8
होम लोन घेऊन 53,984 रुपयांचा EMI भरावा की SIP करावी, कोणता पर्याय फायद्याचा?
प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या स्वप्नातलं घर असायला हवं, घर घेण्यासाठी अवाक्याबाहेर जाऊन लोन काढलं जातं. बँकेकडून कर्ज घ्यावे लागते. मात्र, वर्षानुवर्षे भरावा लागणारा हप्ता (EMI) अनेकदा आर्थिक गणित बिघडवून टाकतो. काही तज्ज्ञांचा दावा आहे की हप्ता भरण्याऐवजी तेवढीच रक्कम म्युच्युअल फंडाच्या एसआयपीमध्ये (SIP) गुंतवली, तर २० वर्षांतच केवळ घर नव्हे, तर मोठे भांडवलही उभे राहू शकते!
advertisement
2/8
होम लोनचा हप्ता आणि एसआयपी, दोन्हीमध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम घालवली तर नेमका कोणता निर्णय घेणं योग्य राहील असा वाटतं सोप्या शब्दात समजून घेऊया. उदाहरणार्थ, 60 लाख रुपयांचे गृहकर्ज 9% वार्षिक व्याजदराने घेतल्यास, दर महिन्याला सुमारे 53,984 रुपये हप्ता भरावा लागतो. पुढील 20 वर्षांत हप्ता भरताना तुम्ही सुमारे 1.30 कोटी रुपये (मूळ रक्कम + व्याज) बँकेला परत कराल.
advertisement
3/8
जर तुम्ही दर महिन्याला 53,984 रुपये एसआयपीमध्ये 12 % वार्षिक परताव्याच्या अपेक्षेने गुंतवले, तर 20 वर्षांनंतर तुमचे एकूण पोर्टफोलिओ 4.96 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते! यामध्ये तुमची मूळ गुंतवणूक फक्त 1.29 कोटी रुपये असेल आणि व्याजाच्या रूपाने तब्बल 3.67 कोटी रुपये मिळतील.
advertisement
4/8
सध्या 70 लाख रुपयांचे घर 6% वार्षिक महागाई दर गृहीत धरल्यास 20 वर्षांनंतर सुमारे 2.24 कोटी रुपये किंमतीचे होईल. याचा अर्थ असा की, घराच्या वाढलेल्या किमतीची भरपाई होण्याइतकी गुंतवणूक एसआयपीद्वारे सहज करता येते आणि तरीही जवळपास २.७५ कोटी रुपये जास्त शिल्लक राहतात!
advertisement
5/8
गृहकर्जाचा हप्ता जवळपास 1.30 कोटी रुपये भरून 70 लाखांचे घर घेणार, एसआयपी गुंतवणूक जवळपास 5 कोटी रुपयांची संपत्ती तयार होणार, यातून स्पष्ट दिसते की, दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवल्यास आणि जोखीम पचवण्याची तयारी असल्यास, एसआयपीद्वारे केवळ घरच नव्हे तर मोठ्या प्रमाणात संपत्तीही तयार करता येऊ शकते.
advertisement
6/8
आर्थिक तज्ज्ञ सांगतात की, "जर तुम्हाला तातडीने घराची गरज नसेल, तर सुरुवातीला भाड्याने राहत एसआयपीमध्ये गुंतवणूक करणे अधिक शहाणपणाचे ठरू शकते. यामुळे तुम्ही व्याजाच्या ओझ्यापासून वाचता आणि भविष्यात घर विकत घेताना जास्त मोठी रक्कम हातात असते."
advertisement
7/8
घर खरेदीचा निर्णय वैयक्तिक गरजांवर, कुटुंबाच्या स्थैर्यावर आणि आर्थिक क्षमतेवर अवलंबून असतो. त्यामुळे प्रत्येकाने आपली स्थिती पाहून योग्य निर्णय घ्यावा, असा सल्लाही तज्ज्ञ देतात.
advertisement
8/8
घराचे भाव भविष्यात किती वाढतील याबाबत खात्री देता येत नाही.शेअर बाजारातून मिळणाऱ्या परताव्यावरही हमी नसते. त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी जोखीम समजून घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Home Loan vs SIP: होम लोन घेऊन 53,984 रुपयांचा EMI भरावा की SIP करावी, कोणता पर्याय फायद्याचा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल