TRENDING:

नोकरी सोडली, मेहनतीच्या जोरावर व्यवसाय केला यशस्वी, तरुणाची महिन्याला 8 लाखांची कमाई

Last Updated:
ख्वाजाने आपल्या कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर स्वप्नांना आकार दिला आहे. आईसोबत मिळून त्याने टेनिस बॉल क्रिकेट बॅटच्या व्यवसाय सुरू केला आणि त्याच बॅट बनविण्याच्या व्यवसायाला स्वतःचा ब्रँड बनवला आहे.
advertisement
1/7
नोकरी सोडली, मेहनतीच्या जोरावर व्यवसाय केला यशस्वी, महिन्याला 8 लाखांची कमाई
प्रामाणिक कष्ट केलं तर नक्कीच यश मिळते. या गोष्टी साध्य केल्यात उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील सर्वसामान्य कुटुंबातील ख्वाजा तांबोळी याने. ख्वाजाने आपल्या कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर स्वप्नांना आकार दिला आहे. आईसोबत मिळून त्याने टेनिस बॉल क्रिकेट बॅटच्या व्यवसाय सुरू केला आणि त्याच बॅट बनविण्याच्या व्यवसायाला स्वतःचा ब्रँड बनवला आहे.
advertisement
2/7
उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा या गावातील ख्वाजा तांबोळी यांनी वयाच्या 25 व्या वर्षापासून बॅट बनविण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली. ख्वाजा तांबोळी या तरुणाचे शिक्षण बी.एससी. केमिस्ट्री पर्यंत झाले आहे.
advertisement
3/7
या व्यवसायात येण्याअगोदर ख्वाजा हे एमआयडीसीमध्ये एका केमिकल कंपनीत कामाला होते. केमिकलपासून त्यांना एलर्जी असल्यामुळे त्यांना ते काम सोडावे लागले.
advertisement
4/7
या फिल्डमध्ये येण्याचा कोणताही विचार केला नव्हता. घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे मला फक्त काम हवं होतं. कुठून तरी सुरुवात करायची म्हणून मी ग्रामपंचायतमध्ये गाळा घेण्याचा विचार केला. ग्रामपंचायतीने देखील सहकार्य करून मला गाळा दिला. मी अचानकपणे स्पोर्टचे दुकान टाकायचे ठरवले.
advertisement
5/7
आईने कुटुंबाचा उदरनिर्वाह करून काही पैसे जमवले होते. आईला माझ्यावर विश्वास होता. आईने सगळे जमा केलेले पैसे मला व्यवसाय करण्यासाठी दिले. या दुकानातून मी ट्रॅक पॅन्ट, टी-शर्ट आणि विविध कंपन्यांचे बॅट्स विकायला सुरुवात केली, असं ख्वाजा सांगतात.
advertisement
6/7
ख्वाजा यांनीही कठोर परिश्रमाच्या बळावर बॅट तयार करण्याचा कारखाना सुरू केला. केटी बॅटस् नावाने त्यांनी बॅटचे उत्पादन सुरू केले. त्यासाठी त्यांनी अनेक रात्री जागून विविध टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नाव असलेल्या बॅट कशा तयार होतात, याचा अभ्यास केला.
advertisement
7/7
सर्वस्तरातील क्रिकेटप्रेमींना योग्य किंमतीत दर्जेदार बॅट उपलब्ध करून दिल्यानेच ख्वाजा यांच्या बॅटने कर्नाटक, उत्तरप्रदेश, झारखंड, गुजरात येथील खेळाडूंच्या मनात स्थान मिळवले आहे. सोलापूरसह महाराष्ट्रातूनही केटी बॅटला चांगली मागणी आहे. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील अनेक नामांकित बॅटच्या ब्रँडना मागे टाकत वडाळाच्या ख्वाजा तांबोळी यांनी तयार केलेल्या बॅटने मात्र स्वतःची ओळख निर्माण केली आहे. या बॅट विक्रीच्या व्यवसायातून युवा उद्योजक ख्वाजा तांबोळी हा महिन्याला सात ते आठ लाख रुपयांची उलाढाल करत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
नोकरी सोडली, मेहनतीच्या जोरावर व्यवसाय केला यशस्वी, तरुणाची महिन्याला 8 लाखांची कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल