कुठं नोकरी करताय? 12 वी पास खेळणी विकणाऱ्याची कमाई बघा, IT वाली नोकरी सोडाल
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
या व्यवसायातून ते महिन्याला 1 लाख रुपयापर्यंतची उलाढाल करत आहेत. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले प्रवीण हे गेल्या 10 वर्षांपासून भातकुलीचा म्हणजेच पितळीपासून, स्टीलपासून बनवलेली घरगुती संसार उपयोगी असणाऱ्या लहान मुलींच्या खेळणी साहित्याची ते विक्री करत आहेत.
advertisement
1/7

स्वतःचे नशीब बदलण्यासाठी काही तरुण रात्रंदिवस झटतात. असाच एक व्यवसाय सोलापुरातील सागर चौक जुना विडी घरकुल येथे राहणारे प्रवीण साका यांनी सुरू केला आहे.
advertisement
2/7
या व्यवसायातून ते महिन्याला 1 लाख रुपयापर्यंतची उलाढाल करत आहेत. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले प्रवीण हे गेल्या 10 वर्षांपासून भातकुलीचा म्हणजेच पितळीपासून, स्टीलपासून बनवलेली घरगुती संसार उपयोगी असणाऱ्या लहान मुलींच्या खेळणी साहित्याची ते विक्री करत आहेत.
advertisement
3/7
प्रवीण गिरीष साका हे गेल्या 10 वर्षांपासून भातकुलीचा व्यवसाय करत आहेत. या भातकुलीच्या भांड्यामध्ये शंभर प्रकारच्या वेगवेगळ्या व्हरायटी उपलब्ध आहेत.
advertisement
4/7
काही समाजात हा भातकुलीच्या भांड्याचा सेट लग्नामध्ये दिला जातो. तर पद्मशाली समाजामध्ये दिवाळीमध्ये हा भातकुलीचा सेट मोठ्या प्रमाणात घेऊन जातात.
advertisement
5/7
लहान मुलींना संसार उपयोगी साहित्याची माहिती व्हावी. कोणत्या भांड्याचा कशाप्रकारे वापरतो याची माहिती या भातकुलीच्या खेळणी भांड्यांमुळे मिळते. प्रवीण साका यांच्याजवळ भातकुलीच्या भांड्यांच्या सेटमध्ये स्टील भांडे आणि पितळी भांडे अशा दोन प्रकारचे सेट मिळते.
advertisement
6/7
एका सेटची किंमत 1500 रुपयांपासून ते 2500 हजार रुपयांपर्यंत आहे. या भातकुलीच्या भांड्यांना मागणी सोलापूर जिल्ह्यासह सांगली, मिरज, लातूर, बार्शी, हैद्राबाद, सिकंदराबाद पर्यंत आहे. तर या व्यवसायातून प्रवीण साका हे महिन्याला 1 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत.
advertisement
7/7
सध्याच्या लहान मुलींचा जास्त कल हा मोबाईलकडे आहे. पालकांनी मुलींना या भातकुलीचे खेळणी भांडे मुलींना द्यावे जेणेकरून त्यांना संसार उपयोगी साहित्याची माहिती मिळेल तसेच मोबाईलच्या आहारी न गेल्याने मानसिक आजाराला तोड द्यावा लागणार नाही, असा सल्ला प्रवीण साका यांनी दिला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
कुठं नोकरी करताय? 12 वी पास खेळणी विकणाऱ्याची कमाई बघा, IT वाली नोकरी सोडाल