TRENDING:

SBI खातेदारांसाठी अलर्ट: या वेळेत NEFT ने पैसे पाठवता येणार नाहीत, पर्याय काय?

Last Updated:
स्टेट बँक ऑफ इंडिया २१ डिसेंबर २०२५ रोजी ०१:५५ ते ०२:४० या वेळेत NEFT सेवा तांत्रिक देखभालीसाठी बंद ठेवणार आहे, पर्यायी UPI, IMPS वापरण्याचा सल्ला.
advertisement
1/6
SBI खातेदारांसाठी अलर्ट: या वेळेत NEFT ने पैसे पाठवता येणार नाहीत, पर्याय काय?
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही उद्या म्हणजेच रविवारी काही मोठे आर्थिक व्यवहार करणार असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
advertisement
2/6
बँकेने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक देखभालीच्या कामामुळे उद्या पहाटे काही काळासाठी NEFT सेवा बंद राहणार आहे. त्यामुळे ऑनलाईन पैसे पाठवता येणार नाहीत, जे पैसे पाठवण्याच्या प्रयत्नात असतील त्यांचे पैसे पाठवले जाणार नाहीत.
advertisement
3/6
बँकेने स्पष्ट केल्यानुसार, ही तांत्रिक दुरुस्ती २१ डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्रीनंतर करण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री उशिरा ०१:५५ वाजल्यापासून ते ०२:४० वाजेपर्यंत ही सेवा तात्पुरती बंद असेल. साधारणपणे ४५ मिनिटांच्या या कालावधीत ग्राहकांना NEFT द्वारे पैसे पाठवता येणार नाहीत किंवा मिळणार नाहीत.
advertisement
4/6
या ४५ मिनिटांच्या कालावधीत ग्राहकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी बँकेने पर्यायी डिजिटल चॅनेल वापरण्याचा सल्ला दिला आहे. जरी NEFT सेवा बंद असली, तरी ग्राहक UPI, IMPS आणि इंटरनेट बँकिंगच्या इतर माध्यमांचा वापर करून आपले व्यवहार पूर्ण करू शकतात. "ग्राहकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि त्यांच्या सहकार्याची अपेक्षा करतो," असे बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
advertisement
5/6
अनेकांना प्रश्न पडतो की बँका अशा प्रकारे सेवा का बंद ठेवतात? याचे मुख्य कारण म्हणजे बँकिंग प्रणालीची सुरक्षा आणि वेग वाढवण्यासाठी वेळोवेळी सर्व्हर आणि सॉफ्टवेअर अपडेट करणे आवश्यक असते. कोणत्याही मोठ्या तांत्रिक बिघाडाची शक्यता टाळण्यासाठी आणि ग्राहकांना अधिक सुरक्षित अनुभव देण्यासाठी अशा प्रकारचे 'शेड्युल मेंटेनन्स' केले जाते.
advertisement
6/6
पहाटेच्या वेळी जरी व्यवहार कमी असले, तरी अनेक व्यावसायिक किंवा तातडीच्या कामासाठी पैसे पाठवणाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसू शकतो. त्यामुळे, जर तुम्हाला उद्या काही महत्त्वाचे पेमेंट करायचे असेल, तर ते या ठराविक वेळेच्या आधी किंवा नंतर करण्याचे नियोजन करा. विशेषतः ज्या व्यवहारांची मर्यादा जास्त आहे आणि ज्यासाठी NEFT चा वापर केला जातो, त्याकडे विशेष लक्ष द्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
SBI खातेदारांसाठी अलर्ट: या वेळेत NEFT ने पैसे पाठवता येणार नाहीत, पर्याय काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल