सेन्सेक्स निफ्टी आपटले! सोन्या-चांदीचाही यू-टर्न, AI मुळे भारतासह USच्या मार्केटमध्ये धुमाकूळ
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
अमेरिकेपासून भारताच्या शेअर बाजारात मोठा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. कारण एआयमुळे आयटी कंपन्यांमध्ये मोठी घसरण आली. तर सोन्या आणि चांदीच्या भावात तेजी पाहायला मिळतेय.
advertisement
1/7

आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) ने शेअर बाजारात धुमाकूळ घातला आहे. अणेरिकेपासून आशियायी बाजार आणि भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. आयटी शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून येत असल्याने सेन्सेक्स-निफ्टीवर विक्रीचा दबाव कायम आहे.
advertisement
2/7
TCS, Infosys, Tech Mahindra आणि Wipro सारख्या शेअरर्समध्ये 6 टक्केपर्यंत घसरण पाहायला मिळाली आहे. तसंच अमेरिकी बाजारात आयटी शेअरचा इंडेक्शन नॅसडॅक 2 टक्केपेक्षा जास्त खाली आला आहे. खरंतर गोल्ड आणि सिल्व्हरच्या किंमतींमध्ये रिकव्हरी पाहायला मिळाली आहे.
advertisement
3/7
शुक्रवारी सकाळी 10.45 वाजेपर्यंत सेन्सेक्स 739.44 किंवा 0.89% कोसळून 82,932.25 वर व्यवहार करत होते. तर निफ्टी 241.45 अंक किंवा 0.94%ने खाली येऊन 25,598. 10 वर व्यवहार करत होते. बीएसईच्या टॉप 30 शेअर्समधून 27 शेअर्समध्ये मोठी घसरण आहे. आयटी शेअरर्समध्ये जवळपास 6 टक्केपर्यंत घसरण पाहायला मिळाली. या व्यतिरिक्त रिलायन्सचे शेयर 1.40 टक्क्यांनी खाली कोसळले.
advertisement
4/7
सोने आणि चांदीचा यू-टर्न : गुरुवारी रात्री उशिरा सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली. सोने जवळजवळ 6000 रुपयांने घसरून ₹1.52 लाख झाले, तर चांदी जवळजवळ 26000 रुपयांनी घसरून 2.37 लाख रुपये झाले. तसंच, सोने आणि चांदीच्या किमती आता वाढीचा कल पाहायला मिळत आहे. सोने सुमारे 1.55 लाख रुपयांवर व्यवहार करत आहे. जवळजवळ 2000 रुपयांने वाढले आहे आणि चांदी 6000 रुपयांपेक्षा जास्त वाढून 2.42 लाख रुपये झाली आहे. तसंच, सोने आणि चांदीच्या ईटीएफमध्ये अजूनही 6% पर्यंत घसरण दिसून येत आहे.
advertisement
5/7
आंतरराष्ट्रीय स्तरावरही सोने आणि चांदीच्या किमती घसरल्या. अमेरिकेतील रोजगाराच्या चांगल्या आकडेवारीमुळे आणि व्याजदर कपातीच्या अपेक्षा कमकुवत झाल्यामुळे गुरुवारी आंतरराष्ट्रीय स्तरावरही सोने आणि चांदीच्या किमती घसरल्या. अमेरिकेत सोने अंदाजे 2.3–2.8% (COMEX/Spot) घसरून सुमारे $4,980–$4,940 प्रति औंस झाले आणि चांदी अंदाजे 8.8% घसरून $75–$76 झाली.
advertisement
6/7
अमेरिकेच्या शेअर बाजारातही मोठी घसरण : अमेरिकेच्या मार्केटमध्ये गुरुवारी रात्री उशीरा डॉऊ जोंस 669.42 अंक किंवा 1.34% कोसळून 49,451.98, नॅसडॅक 469.32 अंक किंवा 2.03% कोसळून 22,597.15 वर बंद झाला. S&P 500 इंडेक्‍स 1.57% किंवा 108.71 अंकांनी कोसळून 6,832.76 वर आला. ही मोठी घसरण एआयमुळे आली आहे.
advertisement
7/7
एआयमुळे बाजार का घसरत आहे? : एआय (Artificial Intelligence) मुळे आयटी शेअर्समध्ये घसरण झाली आहे, कारण अनेक एआय कंपन्या असा दावा करतात की ते बहुतेकदा महाग आणि वेळखाऊ कामे जलद पूर्ण करू शकतात. याचा अर्थ असा की आयटी कंपन्यांचे व्यवसाय मॉडेल धोक्यात आहेत, ज्यामुळे त्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होत आहे आणि शेअर बाजारावर दबाव येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
सेन्सेक्स निफ्टी आपटले! सोन्या-चांदीचाही यू-टर्न, AI मुळे भारतासह USच्या मार्केटमध्ये धुमाकूळ