TRENDING:

Success Story : सॉफ्टवेअर इंजिनिअर सुष्मिताने सुरू केला बिझनेस, वर्षाला 50 लाख उलाढाल

Last Updated:
पुण्यातील सुष्मिता कणेरी यांनी हस्तकलेवर आधारित गुल्लकारी हा व्यवसाय उभा केला आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून देशभरातील विविध भागांतील अनेक कारागिरांच्या हाताला रोजगार मिळवून दिला आहे.
advertisement
1/7
सॉफ्टवेअर इंजिनिअर सुष्मिताने सुरू केला बिझनेस, वर्षाला 50 लाख उलाढाल
आपल्यापैकी काही मोजकेच लोक असे असतात की, जे स्वतः यशस्वी होत असतानाच इतरांनाही यशाच्या मार्गावर आणण्यासाठी झटत असतात आणि याचंच उत्तम उदाहरण म्हणजे पुण्यातील सुष्मिता कणेरी. सुष्मिता यांनी हस्तकलेवर आधारित गुल्लकारी हा व्यवसाय उभा केला आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून देशभरातील विविध भागांतील अनेक कारागिरांच्या हाताला रोजगार त्यांनी मिळवून दिला आहे.
advertisement
2/7
पारंपरिक हस्तकलेला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे काम या उपक्रमातून होत आहे. विशेष म्हणजे, या व्यवसायातून सध्या वर्षाला तब्बल 50 लाखांपेक्षा अधिक उलाढाल होत आहे. त्यांच्या या प्रवासाविषयी त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
advertisement
3/7
सुष्मिता यांनी सांगितलं की 2020 साली त्याचं विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT) पुणे येथून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली. लहानांपासून समाजसेवेची आवड असल्याने त्यांनी नोकरी करण्याचा विचार न करता त्यांनी समाजासाठी काहीतरी करण्याचं ठरवलं त्यातूनचं गुल्लकारी या व्यवसायाचा जन्म झाला. त्यांचे स्वतःचे शिक्षण सॉफ्टवेअर क्षेत्रातून झाले असल्याने त्यांनी गुल्लकारी नावाचे एक प्लॅटफॉर्म निर्माण केले आहे. या प्लॅटफॉर्मवर देशभरातील कारागीर आपल्या वस्तू विकू शकतात.
advertisement
4/7
सुष्मिता यांनी सांगितले की, त्यांनी 2021 साली सुरुवातीला ‘गुल्लक’ नावाचा प्लॅटफॉर्म सुरू केला होता. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देणगीदारांकडून थोडेथोडे पैसे जमा करून ते सामाजिक कामासाठी वापरले जात होते.मात्र काही काळानंतर लोकांना दान देण्यापेक्षा त्यांना आत्मनिर्भर बनवणे अधिक गरजेचे असल्याचे सुष्मिता यांच्या लक्षात आले. यासाठी नेमके काय करता येईल, याचा अभ्यास करत त्यांनी देशभरात जवळपास 10 हजार किलोमीटरचा प्रवास केला.
advertisement
5/7
प्रवासातून त्यांना कारागिरांचा संघर्ष, त्यांच्या अडचणी आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यातील समस्या समजल्या.याच अनुभवातून गुल्लकारी’ हा प्लॅटफॉर्म उभा राहिला. या ठिकाणी कारागीर थेट ग्राहकांशी जोडले जात असून त्यांच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री होते. 2023 साली गुल्लकारीची सुरुवात करण्यात आली. पारंपारिक कलेला सन्मान आणि ओळख मिळवून देणे हा या प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
6/7
गुल्लकारी सध्या 13 हून अधिक लोप पावण्याच्या मार्गावर असलेल्या पारंपरिक कलांना जतन करण्याचे काम करत आहे. या प्रत्येक कलेचा स्वतंत्र इतिहास असून त्याला मोठे सांस्कृतिक महत्त्व आहे.
advertisement
7/7
या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील वारली चित्रकला, बंगाल आणि ओडिशाची पटचित्र कला, मध्य प्रदेशची गोंड पेंटिंग, कर्नाटकाची चित्तारा कला, तेलंगणातील नायकपोड मास्क तसेच आंध्र प्रदेशची थोलू बोम्मलाटा अशा विविध पारंपरिक कलांचा समावेश करण्यात आला आहे. या माध्यमातून या कलांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न गुल्लकारीकडून केला जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Success Story : सॉफ्टवेअर इंजिनिअर सुष्मिताने सुरू केला बिझनेस, वर्षाला 50 लाख उलाढाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल