Success Story : शासकीय अधिकारी बनता आलं नाही, साड्यांचा व्यवसाय करण्याचा घेतला निर्णय, महिन्याला इतकी कमाई
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
स्वप्ना त्रिमुखे यांनी आपल्या आईने सुरू केलेला साड्यांचा व्यवसाय पुढे नेण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्या हा व्यवसाय यशस्वीपणे नऊ वर्षांपासून करत आहेत.
advertisement
1/7

नोकरी पेक्षा व्यवसाय हे आज कमाईचे मोठे साधन बनले आहे. त्यामुळे अनेक जण व्यवसायाकडे वळताना पाहायला मिळतात. बोरिवलीतील स्वप्ना त्रिमुखे यांनी आपल्या आईने सुरू केलेला साड्यांचा व्यवसाय पुढे नेण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्या हा व्यवसाय यशस्वीपणे नऊ वर्षांपासून करत आहेत.
advertisement
2/7
स्वप्ना यांचं लहानपणापासून गव्हर्नमेंट ऑफिसर व्हायचं स्वप्न होतं, पण काही कारणास्तव त्या मार्गाने जाता आलं नाही. पण त्यांनी हार मानली नाही. त्या अनुभवातून प्रेरणा घेत व्यवसायात उडी घेतली आणि आज त्या महिन्याला 1 लाख रुपयांपर्यंत कमाई करतात.
advertisement
3/7
त्यांच्या व्यवसायासाठी त्या वेगवेगळ्या राज्यांतून, विशेषतः तामिळनाडू आणि कोलकात्यामधून पारंपरिक आणि दर्जेदार साड्या मागवतात. त्या स्वतः त्या भागात जाऊन साड्या निवडतात, त्यामुळे त्यांच्याकडे असलेली उत्पादने दर्जेदार असून ग्राहकांचा त्यांच्यावर विश्वास आहे.
advertisement
4/7
स्वप्ना सांगतात की, व्यवसाय सुरू करताना अनेक अडचणी आल्या पण त्यांनी कधीही हार मानली नाही. या प्रवासात त्यांना त्यांच्या पतीचा, सासू-सासऱ्यांचा आणि त्यांच्या आई-वडिलांचा मोठा पाठिंबा मिळाला.
advertisement
5/7
हा व्यवसाय करताना ते त्यांच्या खंबीरपणे मागे उभे राहिले. त्यांच्या पाठिंब्यामुळेच स्वप्ना आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकल्या. खचून न जाता, प्रयत्न करत राहिले म्हणूनच माझा ब्रँड उभा राहिला, असे त्या अभिमानाने सांगतात.
advertisement
6/7
स्वप्ना यांचे यश हे अनेक महिलांसाठी प्रेरणादायक आहे. त्या म्हणतात, स्त्रियांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे. स्वावलंबी बनल्यास कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही.
advertisement
7/7
त्यांच्या यशकथेवरून हेच शिकायला मिळतं की, चिकाटी, मेहनत, आत्मविश्वास आणि कुटुंबाचा पाठिंबा यांच्या जोरावर कोणतीही स्त्री आपलं स्वप्न पूर्ण करू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Success Story : शासकीय अधिकारी बनता आलं नाही, साड्यांचा व्यवसाय करण्याचा घेतला निर्णय, महिन्याला इतकी कमाई