TRENDING:

Helicopter Rent : हेलिकॉप्टरचं भाडं किती? लग्नात वधू-वरांच्या एन्ट्रीसाठी हवं असेल तर किती खरंच येतो, काय आहे नियमावली?

Last Updated:
आता 'स्टेटस सिम्बॉल'ची व्याख्या बदलली आहे. आता फक्त रस्तेच नाही, तर आभाळही लग्नाच्या वरातीने गजबजणार आहे. सध्या लग्नात हेलिकॉप्टरमधून एन्ट्री करणे किंवा नवरीची विदाई हेलिकॉप्टरने करणे हा नवा ट्रेंड वेगाने लोकप्रिय होत आहे.
advertisement
1/9
हेलिकॉप्टरचं भाडं किती? लग्नात हवं असेल तर किती खरंच येतो, काय आहे नियमावली?
लग्नाचा सीझन म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो झगमगाट, बँड-बाजा आणि नटलेला नवरदेव. पूर्वी नवरदेव घोड्यावर बसून यायचा, मग काळ बदलला आणि लक्झरी गाड्यांची क्रेझ आली. पण आता 'स्टेटस सिम्बॉल'ची व्याख्या बदलली आहे. आता फक्त रस्तेच नाही, तर आभाळही लग्नाच्या वरातीने गजबजणार आहे. सध्या लग्नात हेलिकॉप्टरमधून एन्ट्री करणे किंवा नवरीची विदाई हेलिकॉप्टरने करणे हा नवा ट्रेंड वेगाने लोकप्रिय होत आहे.
advertisement
2/9
तुमच्याही मनात असा रॉयल प्लॅन असेल, तर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नक्की किती खिसा रिकामा करावा लागतो? परमिशन कशी मिळते? आणि बुकिंगची प्रोसेस काय असते? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी तुमची मदत करणार आहोत.
advertisement
3/9
लग्नाचा दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस असतो. तो आयुष्यभर लक्षात राहावा यासाठी लोक आता लाखो रुपये खर्च करायला तयार आहेत. ग्रामीण भागापासून ते शहरांपर्यंत आता हेलिकॉप्टर भाड्याने घेण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक खासगी ट्रॅव्हल एजन्सी आणि एव्हिएशन कंपन्या आता 'वेडिंग चार्टर सर्व्हिसेस' (Wedding Charter Services) देत आहेत. 'पवन हंस', 'ब्लूहाइट्स एव्हिएशन' आणि 'एअर चार्टर्स इंडिया' सारख्या कंपन्या या शर्यतीत आघाडीवर आहेत.
advertisement
4/9
नक्की खर्च किती येतो? (Budget and Costs)हेलिकॉप्टरचे भाडे हे प्रामुख्याने त्याच्या मॉडेलवर, त्यातील सीटच्या संख्येवर आणि उड्डाणाच्या वेळेवर अवलंबून असते.साधारणपणे हेलिकॉप्टरचे भाडे प्रति तास 50,000 रुपयांपासून सुरू होते.जर तुम्हाला मोठे किंवा अधिक लक्झरी हेलिकॉप्टर हवे असेल, तर हा खर्च 2 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत किंवा त्याहून अधिक जाऊ शकतो.अनेक कंपन्या किमान 1 ते 2 तासांचे भाडे आकारतात, मग तुमचे उड्डाण केवळ 15 मिनिटांचे का असेना.
advertisement
5/9
अतिरिक्त खर्चाचा मोठा आकडाफक्त हेलिकॉप्टरचे भाडे दिले म्हणजे काम झाले असे नाही. यामागे इतरही अनेक खर्च असतात:जिथे हेलिकॉप्टर उतरायचे आहे, तिथे तात्पुरते हेलिपॅड बनवावे लागते. जमीन समतल करणे, तिथे 'H' मार्किंग करणे आणि सुरक्षा घेरा तयार करण्यासाठी वेगळा खर्च येतो.विमानतळ किंवा विशिष्ट ठिकाणी लँडिंग करण्यासाठी आणि हेलिकॉप्टर पार्क करण्यासाठी शुल्क भरावे लागते.पायलट आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांचा राहण्याचा आणि खाण्याचा खर्चही यात जोडला जातो.
advertisement
6/9
परवानगी कशी आणि कोणाची घ्यायची?हेलिकॉप्टर हवेत उडवणे ही काही कार चालवण्याइतकी सोपी गोष्ट नाही. यासाठी कडक नियमावली असते:स्थानिक पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी आणि 'भारतीय विमानतळ प्राधिकरण' (AAI) यांची परवानगी आवश्यक असते.काही संवेदनशील भागात उड्डाण करण्यासाठी भारतीय हवाई दलाची (IAF) एनओसी (NOC) लागते.
advertisement
7/9
सुदैवाने, बहुतेक हेलिकॉप्टर भाड्याने देणाऱ्या कंपन्या स्वतःच या सर्व परवानग्यांचे काम सांभाळतात. तुम्हाला फक्त तुमचे ओळखपत्र आणि ठिकाणाची माहिती द्यावी लागते.
advertisement
8/9
कसं कराल बुकिंग?आजच्या डिजिटल युगात हेलिकॉप्टर बुक करणे सोपे झाले आहे. तुम्ही कंपन्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तारीख, वेळ आणि ठिकाण टाकून कोटेशन मागवू शकता. लग्नाच्या किमान 1-2 महिने आधी बुकिंग करणे केव्हाही फायदेशीर ठरते, जेणेकरून वेळेवर परवानग्या मिळण्यास अडचण येत नाही.
advertisement
9/9
थोडक्यात काय तर, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या सोहळ्याला 'रॉयल टच' द्यायचा असेल, तर हेलिकॉप्टर हा एक उत्तम पर्याय आहे. मात्र, यासाठी फक्त स्वप्न असून चालणार नाही, तर खिशात किमान 5 ते 10 लाखांची तरतूद असणेही तितकेच गरजेचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Helicopter Rent : हेलिकॉप्टरचं भाडं किती? लग्नात वधू-वरांच्या एन्ट्रीसाठी हवं असेल तर किती खरंच येतो, काय आहे नियमावली?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल