Fixed Deposit Rule: कमीत कमी किती दिवसांचं करता येतं Fixed Deposit? प्रत्येकाला माहिती हवा हा नियम
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Fixed Deposit Rule: सध्याच्या गुंतवणुकीच्या विविध पर्यायांमध्ये बँकेतील फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) हा एक सर्वात सोपा आणि सुरक्षित पर्याय मानला जातो. या माध्यमातून ठरावीक कालावधीनंतर निश्चित परतावा मिळतो आणि बाजारातील चढ-उतारांचा परिणाम या गुंतवणुकीवर होत नाही.
advertisement
1/7

मुंबई: सध्या शेअर मार्केट, सोनं किंवा म्युच्युअल फंड या सगळ्यात सुरक्षित कोणते पैसे असतील तर फिक्स डिपॉझिटचे आहेत. याचं कारण म्हणजे तुम्ही FD ला ठेवलेल्या पैशांमध्ये कोणतंही नुकसान होत नाही. त्यामुळे बऱ्यावेळी इमरजन्सीमध्ये FD चे पैसे तुम्ही काढूनही घेऊ शकता. FD करायची म्हणजे किमान ९ महिने किंवा एक वर्ष आपल्याला बँकेत करायला सांगतात पण तुम्हाला माहितीय का यापेक्षाही कमी FD करता येते.
advertisement
2/7
सध्याच्या गुंतवणुकीच्या विविध पर्यायांमध्ये बँकेतील फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) हा एक सर्वात सोपा आणि सुरक्षित पर्याय मानला जातो. या माध्यमातून ठरावीक कालावधीनंतर निश्चित परतावा मिळतो आणि बाजारातील चढ-उतारांचा परिणाम या गुंतवणुकीवर होत नाही.
advertisement
3/7
फिक्स्ड डिपॉझिटसाठी किमान कालावधी सर्वसाधारणपणे 7 दिवसांपासून ते 1 महिन्यापर्यंत कितीही असू शकतो. प्रत्येक बँकेनुसार हे नियम बदलतात. काही ठिकाणी 7 दिवस ते 1 महिना, तर काही ठिकाणी 14, 15 दिवसांपासून ते एक महिन्यापर्यंतची मुदत किमान एफडीसाठी ठेवण्यात आलेली असते.
advertisement
4/7
उदाहरणार्थ, बँक ऑफ बडोदामध्ये 1 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीसाठी किमान 15 दिवस, तर 1 कोटीहून अधिक रकमेच्या एफडीसाठी किमान 7 दिवसांची मुदत ठरवण्यात आली आहे.
advertisement
5/7
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देखील एफडीची किमान मुदत 7 दिवसांपासून ठेवण्यात आली आहे. कमाल मुदतीबाबत बोलायचे झाले, तर बहुतेक बँका 120 महिने म्हणजेच 10 वर्षांपर्यंतची एफडी स्वीकारतात. काही विशेष परिस्थितींमध्ये ही मुदत वाढवता येते, पण एफडीची कालमर्यादा 20 वर्षांपेक्षा जास्त नसते.
advertisement
6/7
फायदे- फिक्स्ड डिपॉझिटमध्ये कोणताही जोखीम नसतो.ज्येष्ठ नागरिकांना सामान्य दरापेक्षा जास्त व्याजदर दिला जातो. एफडी पूर्ण झाल्यावर गुंतवणूकदाराला मूळ रक्कम आणि व्याजासह संपूर्ण परतावा मिळतो. बँक किंवा पोस्ट ऑफिस या दोन्ही ठिकाणी एफडी करता येते.
advertisement
7/7
फिक्स डिपॉझिटमध्ये तुम्हाला पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही बँकेच्या अॅपवरुन गुंतवू शकता, तुम्हाला ऑफलाईन FD करायची असेल तर मात्र 7 दिवसांची करता येत नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या शाखेतील बँकेशी संपर्क करावा लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Fixed Deposit Rule: कमीत कमी किती दिवसांचं करता येतं Fixed Deposit? प्रत्येकाला माहिती हवा हा नियम