Mumbai : मुंबईत बेस्ट बसने 13 जणांना चिरडलं, चौघांचा मृत्यू, घटनास्थळाचे भयावह Photo
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
मुंबईच्या भांडूपमध्ये बेस्ट बसने 12-13 जणांना चिरडलं आहे. ताबा सुटलेल्या या बसने रांगेत उभ्या असलेल्या लोकांना चिरडलं, ज्यात चौघांचा मृत्यू झाला आहे.
advertisement
1/7

मुंबईच्या भांडूप भागामध्ये बेस्ट बसने 12-13 जणांना चिरडलं आहे. बसने चिरडल्यामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे, ज्यात दोन महिला आहेत. या अपघातात 9 जण जखमी आहेत
advertisement
2/7
भांडूप पश्चिम रेल्वे स्टेशनजवळ बेस्ट बसने 12-13 जणांना चिरडलं. भांडूप रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या बस डेपोजवळ ही घटना घडली आहे. बसने चिरडल्यानंतर चौघांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे.
advertisement
3/7
कामावरून घरी जायची वेळ असल्यामुळे भांडूप रेल्वे स्टेशन परिसरात गर्दी होती. बेस्ट बससाठी प्रवासी रांगेत उभे होते, तेव्हाच बसने रांगेत उभे असलेल्या लोकांना चिरडलं आहे.
advertisement
4/7
बसने दिलेल्या धडकेमध्ये विजेचा खांबही कोलमडला आहे. बस अनियंत्रित झाल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती भांडूप बस डेपो परिसरात असलेल्या दुकानदारांनी दिली आहे. दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.
advertisement
5/7
अपघात झालेली ही बस ईव्ही अर्थात इलेक्ट्रिक व्हेइकल आहे. दरम्यान बसचा ब्रेक फेल झाला होता का ड्रायव्हरचा बसवरचा ताबा सुटला? याचा तपास पोलीस करत आहेत.
advertisement
6/7
बसचा ताबा सुटला होता आणि त्यानंतर टर्न मारून वेगामध्ये बस निघून गेली. बससाठी लाईनही होती, 20-25 जण रांगेत उभे होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
advertisement
7/7
बसच्या रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांसह बसने तिथे असलेल्या फेरीवाल्यांनाही चिरडल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोलिसांसोबत अग्निशमन दलही दाखल झालं आहे. बसचा ब्रेक फेल झाला होता? बसमध्ये काही तांत्रिक बिघाड होता का? ड्रायव्हरकडून काही चूक झाली का? याचा तपास सुरू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai : मुंबईत बेस्ट बसने 13 जणांना चिरडलं, चौघांचा मृत्यू, घटनास्थळाचे भयावह Photo