Weather Forecast : राज्यात या भागात असेल उष्णतेची लाट, हवामान विभागाला नेमकं हे कसं कळतं?
- Published by:Rahul Punde
Last Updated:
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या हवामानामध्ये विविध बदल होत आहेत. काही ठिकाणी तापमापकाचा पारा चढला आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झालं आहे. हवामान विभागाने येत्या काही दिवसांत अवकाळी पावसाचाही अंदाज व्यक्त केला आहे.
advertisement
1/7

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या हवामानामध्ये विविध बदल होत आहेत. काही ठिकाणी तापमापकाचा पारा चढला आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झालं आहे. हवामान विभागाने येत्या काही दिवसांत अवकाळी पावसाचाही अंदाज व्यक्त केला आहे.
advertisement
2/7
राज्यात कोणत्या ठिकाणी गारपीट होईल, थंडी पडेल किंवा तापमान वाढेल हे सर्व अंदाज हवामान खातं देत असतं. कारण, हवामान खातं आगामी काही दिवसांच्या हवामानाबाबत आधीच अंदाज बांधत असते. हवामान खात्याला ही माहिती अगोदरच कशी मिळते? याची माहिती अनेकांना नाही.
advertisement
3/7
हवामानाचा अंदाज बांधण्यासाठी अनेक घटक विचारात घेतले जातात. यासाठी विविध उपकरणांच्या साह्याने वातावरण, जमिनीच्या पृष्ठभागाचं तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग व दिशा, दव, ढगांची स्थिती इत्यादी घटकांचं निरीक्षण केलं जातं. यासाठी अनेक प्रकारची यंत्रं आणि उपकरणं वापरली जातात. पावसासाठी पर्जन्यमापक, वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी ॲनिमोमीटर, वाऱ्याची दिशा तपासण्यासाठी विंडव्हेन, बाष्पीभवनाचा दर मोजण्यासाठी पॅन-इव्हॅपोरिमीटर, सनशाइन रेकॉर्डर, दव मोजण्यासाठी ड्यू-गेज, जमिनीचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर इत्यादींचा वापर केला जातो.
advertisement
4/7
याशिवाय हाय-स्पीड कम्प्युटर, हवामानविषयक उपग्रह, एअर बलून आणि वेदर रडार ही उपकरणंदेखील हवामानाची माहिती गोळा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. गोळा केलेल्या सर्व डेटाचा अभ्यास केला जातो. सध्याचा डेटा आणि मागचा हवामान डेटादेखील पाहिला जातो आणि यानंतर हवामानाचा अंदाज बांधला जातो.
advertisement
5/7
हवामान खात्याचे अनेक उपग्रह आहेत. ते सतत पृथ्वीची छायाचित्रं पाठवत असतात. त्यामुळे आकाशात ढग आहेत की नाहीत याचा अंदाज घेता येतो. पावसाचा अंदाज घेण्यासाठी ढगांमध्ये किती पाणी आहे, हे बघावं लागतं. त्यासाठी पृथ्वीवरून आकाशाच्या दिशेने रडार सोडलं जातं. रडारद्वारे पाठवलेल्या वेव्ह्ज ढगांवर आदळून परत येतात आणि नंतर त्यांचा अभ्यास केला जातो. त्यानंतर कुठे पाऊस पडू शकतो, याचा अंदाज हवामान खात्याला वर्तवता येतो.
advertisement
6/7
कोणत्या शहरात किती मिलीमीटर पाऊस पडला, याचीही माहिती हवामान खात्याकडून दिली जाते. पावसाचं मोजमाप करण्यासाठी हवामान खात्याकडे फनेल्स असतात. ती अशा ठिकाणी ठेवलेली असतात जिथे मोठ्या इमारती किंवा झाडांचा अजिबात अडथळा नसेल, जेणेकरून पावसाचं पाणी पडल्यावर फनेल व्यवस्थित भरतात. फनेलवर एमएममध्ये आकडे लिहिलेले असतात. पाऊस थांबल्यानंतर हे आकडे बघून कोणत्या ठिकाणी किती मिलिमीटर पाऊस पडला हे जाहीर केलं जातं.
advertisement
7/7
हवामान खातं चार प्रकारचे अंदाज बांधतं. पुढच्या 24 तासांसाठी, 1 ते 3 दिवसांसाठीचा लघू मुदतीचा अंदाज, 4 ते 10 दिवसांसाठी मध्यम मुदतीचा अंदाज आणि 10 दिवसांपेक्षा जास्त दिवसांचा विस्तारित मुदतीचा अंदाज, असे हे चार प्रकार आहेत. यापैकी मध्यम मुदतीचे बहुतांश अंदाज बरोबर ठरतात. त्याला साधारणपणे येत्या सात ते आठ दिवसांचा अंदाज म्हणतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Forecast : राज्यात या भागात असेल उष्णतेची लाट, हवामान विभागाला नेमकं हे कसं कळतं?