TRENDING:

Weather Alert: वारं फिरलं, महाराष्ट्रात 24 तासांत हवापालट, कुठं गारपीट, तर कुठं वेगळाच अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात येत्या 24 तासांत मोठ्या बदलांची शक्यता आहे. 5 एप्रिलचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/7
Weather Alert: वारं फिरलं, महाराष्ट्रात 24 तासांत हवापालट, कुठं गारपीट, तर कुठं वेगळाच अलर्ट
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात वादळी पाऊस अन् गारपिटीने कहर केला. आता मात्र राज्यात अवकाळी हवामानाचा प्रभाव कमी होत आहे. 5 एप्रिलला रोजी बहुतेक भागांत शुष्क ते मुख्यतः कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. परंतु काही भागांत वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता कायम आहे. तापमानात फारसा मोठी बदल नाही, परंतु काही भागांत कमाल तापमान सामान्य किंवा थोडे कमी राहील. 
advertisement
2/7
कोकणात आज मुख्यत: कोरडे हवामान राहील. मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांत पावसाची शक्यता खूप कमी आहे. तापमान 32-36 अंशांच्या दरम्यान राहील. तर मुंबईचा पारा 34 अंशांवर राहील. पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती कायम राहील.
advertisement
3/7
मध्य महाराष्ट्रात रविवारी पावसाचा जोर काहीसा कमी राहील. मात्र, तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजा आणि हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. पुण्यात मुख्यत: निरभ्र ते अंशत: ढगाळ हवामान राहील. सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर परिसरात हलक्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 34-37 अंशांवर राहील.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रात हवापालट झाल्याचे चित्र आहे. पावसाचा जोर कमी झाला असून आता उन्हाचा पारा चढण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार परिसरात हवामान कोरडे राहील. तर नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर परिसरात पुढील 24 तास विजांसह पावसाचा अंदाज आहे.
advertisement
5/7
मराठवाड्यात मात्र पुढील 24 तास अवकाळीचा धोका कायम आहे. परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर छ. संभाजीनगरसह उर्वरित जिल्ह्यांत देखील विजांसह तुरळक पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 35-39 अंशांच्या दरम्यान राहील.
advertisement
6/7
विदर्भात पुढील 4 दिवस अवकाळीचा धोका कायम आहे. आज नागपूरसह चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्ह्यांना कोणताही महत्त्वाचा अलर्ट नाही. कमाल तापमान 36-40 अंशांवर कायम राहील. काही ठिकाणी पारा 42 अंशांपर्यंत चढण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
एकंदरीत, महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी सावध राहावे. गारपीट आणि जोरदार वाऱ्यांमुळे शेतीचे नुकसान होऊ शकते. विदर्भ विगळता उर्वरित राज्यातील अवकाळीचा धोका कमी होणार आहे. आज तापमान सामान्य ते थोडे कमी राहण्याची शक्यता आहे. तर पुढील 2-3 दिवसांत हळूहळू वाढ अपेक्षित आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: वारं फिरलं, महाराष्ट्रात 24 तासांत हवापालट, कुठं गारपीट, तर कुठं वेगळाच अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल