11 व्या वर्षी केलं डेब्यू, प्रोड्यूसरशी लग्न करण्यासाठी बदलला धर्म, त्याच पतीने लेकाच्या वाढदिवशी अभिनेत्रीवर झाडल्या गोळ्या
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Actress Tragic Death: एका प्रसिद्ध अभिनेत्रीला तिच्या पतीनेच त्यांच्या मुलाच्या वाढदिवशी गोळ्या झाडून ठार केलं होतं. या घटनेने केवळ इंडस्ट्रीच नाही, तर संपूर्ण देश हादरला होता.
advertisement
1/11

सिनेसृष्टीच ग्लॅमर बाहेरून पाहताना आकर्षक आणि झगमगाटीचं वाटतं, मात्र त्याच्या खोलवर किती गोष्टी दडलेल्या आहेत याचा पत्ता कोणालाच नसतो. या इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्धीच्या शिखरावर असणाऱ्या कलाकारांच्या खाजगी आयुष्यात किती दुःख दडलंय, हे त्या कलाकारांनाच माहीत असतं.
advertisement
2/11
अशीच एक अतिशय धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना १९९० साली घडली होती, ज्यामुळे केवळ इंडस्ट्रीच नाही, तर संपूर्ण देश हादरला होता. एका प्रसिद्ध अभिनेत्रीला तिच्या पतीनेच त्यांच्या मुलाच्या वाढदिवशी गोळ्या झाडून ठार केलं होतं.
advertisement
3/11
या दुर्दैवी अभिनेत्रीचं नाव होतं सईदा खान. एकेकाळी किशोर कुमार आणि मनोज कुमार यांच्यासारख्या दिग्गजांसोबत काम करणाऱ्या सईदा खान यांचा अंत इतका भयानक असेल, असं कोणालाही वाटलं नव्हतं.
advertisement
4/11
एका मुस्लिम कुटुंबात जन्माला आलेल्या सईदा खानने चित्रपट निर्माते एच. एच. रवैल यांच्या मदतीने त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी अभिनयाला सुरुवात केली होती. 'अपना हाथ जगन्नाथ' मध्ये किशोर कुमार यांच्यासोबत आणि 'कांच की गुडिया' मध्ये मनोज कुमार यांच्यासोबत काम केल्यावर त्या रातोरात स्टार बनल्या.
advertisement
5/11
मात्र, हळूहळू त्यांचं करिअर ढासळू लागलं. त्यांना काम मिळेनासं झालं आणि अखेर आपला उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना लहान-मोठे रोल करावे लागले. याच काळात त्या दिग्दर्शक बृज सदाना यांच्या प्रेमात पडल्या. बृज यांच्याशी लग्न करण्यासाठी सईदा यांनी त्यांचा धर्मही बदलला.
advertisement
6/11
दोघांनी लग्न केलं आणि त्यांना कमल हा मुलगा आणि नम्रता ही मुलगी झाली. सुरूवातीला सगळंच छान होतं. पण, या सुखी संसाराला कोणाची तरी दृष्ट लागली आणि त्याच्या मुलाच्या २० व्या वाढदिवशीच असं काही घडलं, ज्याचा कोणाही विचार केला नव्हता.
advertisement
7/11
सईदा यांचा मुलगा कमलच्या २० व्या वाढदिवशी घरातील वातावरण अतिशय आनंदी होतं. पाहुणे आले होते, सईदा आपल्या लाडक्या लेकाच्या वाढदिवसाच्या तयारीत गुंतल्या होत्या. पण त्याच वेळी दारूच्या नशेत असलेल्या बृज सदाना यांनी रागाच्या भरात पिस्तूल काढलं आणि स्वतःची पत्नी सईदा आणि मुलगी नम्रता यांच्यावर गोळ्या झाडल्या.
advertisement
8/11
एवढ्यावरच न थांबता त्यांनी मुलगा कमल याच्यावरही गोळी झाडली आणि शेवटी स्वतःलाही संपवलं. सईदा आणि त्यांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. अवघ्या ४० व्या वर्षी सईदा यांनी जगाचा निरोप घेतला.
advertisement
9/11
सईदा यांचा मुलगा कमल आता सिनेसृष्टीत सक्रिय असून एका मुलाखतीत त्याने स्वतः आपल्या आईच्या मृत्यूचा थरार सांगितला होता. तो म्हणाला, "माझ्या मानेला स्पर्श करून गोळी गेली होती. मी वाचलो, यामागे कोणताही तार्किक आधार नाही. कदाचित देवाला मला पुढे काहीतरी शोधण्यासाठी जिवंत ठेवायचं होतं."
advertisement
10/11
कमल पुढे म्हणाला, "मी माझ्या आई आणि बहिणीला रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं. मी त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये धावलो, पण तिथे बेड नव्हते. मी डॉक्टरांना विनवणी करत होतो की, माझी आई आणि बहिणीला वाचवा. जेव्हा सर्जरीनंतर मला जाग आली, तेव्हा मला कळलं की माझं संपूर्ण कुटुंब आता संपलं आहे."
advertisement
11/11
बृज सदाना यांनी असं का केलं, याचं कोडं आजही पूर्णपणे सुटलेलं नाही. पण एका क्षणाच्या रागामुळे आणि व्यसनामुळे एका निष्पाप अभिनेत्रीचा बळी गेला आणि एक हसतं-खेळतं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झालं. सईदा खान यांची ही कहाणी आजही बॉलिवूडमधील सर्वात भयानक आणि दुःखद घटनांपैकी एक मानली जाते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/
11 व्या वर्षी केलं डेब्यू, प्रोड्यूसरशी लग्न करण्यासाठी बदलला धर्म, त्याच पतीने लेकाच्या वाढदिवशी अभिनेत्रीवर झाडल्या गोळ्या