Weather Alert: अवकाळी संकट टळलं, पण पुन्हा वारं फिरलं, महाराष्ट्रात आज वेगळाच अलर्ट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रावर गेल्या 3-4 दिवसांपासून घोंघावणारं अवकाळी संकट टळलं आहे. गुरुवारी कोकण ते विदर्भ वेगळाच अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
1/5

आजचं हवामान</a> अपडेट जाणून घेऊ." width="1500" height="1000" /> यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच राज्यात हवामानाचे चढ-उतार सातत्याने पाहायला मिळत आहेत. कधी कडाक्याची थंडी, तर कधी अचानक वाढलेले कडक ऊन आणि काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली—असे मिश्र चित्र राज्यभर दिसून आले. गेल्या दोन-चार दिवसांत काही जिल्ह्यांत पावसाच्या सरीही पडल्या. मात्र आता पुन्हा हवापालट होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 26 फेब्रुवारी रोजी राज्यात कुठेही पावसाची शक्यता वर्तवलेली नाही. त्यामुळे आज पुन्हा उष्णतेचा प्रभाव वाढताना दिसणार आहे. कोकण ते विदर्भ महाराष्ट्रातील आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज आकाश निरभ्र राहणार आहे. पावसाचा कोणताही अंदाज नाही. दुपारच्या वेळेत उन्हाचा तडाखा वाढेल आणि उकाडा जाणवेल. कमाल तापमान सुमारे 34 ते 35 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान त22ते 24 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. ठाणे आणि नवी मुंबईतही अशाच प्रकारचे उष्ण आणि किंचित दमट हवामान राहील. कोकण किनारपट्टी भागात दुपारी आर्द्रतेमुळे उष्णता अधिक जाणवू शकते.
advertisement
3/5
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर परिसरात आज हवामान कोरडे आणि स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे. सकाळी थोडा गारवा जाणवला तरी दुपारपर्यंत तापमानात वाढ होईल. कमाल तापमान 35 ते 37 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते. पावसाची शक्यता नाही.
advertisement
4/5
मराठवाड्यात औरंगाबाद, बीड, लातूर, धाराशिव, जालना आणि नांदेड भागात आज हवामान प्रामुख्याने स्वच्छ राहील. मागील काही दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर आज उष्णतेत वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 34 ते ३36अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 19 ते 22 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते. पावसाचा अंदाज सध्या व्यक्त करण्यात आलेला नाही.
advertisement
5/5
विदर्भात आज हवामान पूर्णपणे बदललेले दिसणार आहे. गेल्या काही दिवसांत काही जिल्ह्यांत ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या; मात्र आज संपूर्ण विभागात कोरडे आणि स्वच्छ हवामान राहण्याची शक्यता आहे. नागपूर, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा या पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांत दुपारच्या वेळेत तापमानात झपाट्याने वाढ होईल. येथे कमाल तापमान 35 ते37 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान 19ते 21 अंश सेल्सिअस च्या आसपास राहील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: अवकाळी संकट टळलं, पण पुन्हा वारं फिरलं, महाराष्ट्रात आज वेगळाच अलर्ट