TRENDING:

T20 वर्ल्ड कपचा हिरो IPL मध्ये बॅन, एक चूक अन् BCCI ने हंटर चालवला!

Last Updated:
भारत आणि श्रीलंकेमध्ये सध्या टी-20 वर्ल्ड कप सुरू आहे. सुपर-8 स्टेज आता ऐन रंगात आलेली असून लवकरच सेमी फायनलचं चित्र स्पष्ट होईल, पण वर्ल्ड कप गाजवणाऱ्या खेळाडूवर आयपीएलमध्ये बंदी घालण्यात आली आहे.
advertisement
1/7
T20 वर्ल्ड कपचा हिरो IPL मध्ये बॅन, एक चूक अन् BCCI ने हंटर चालवला!
टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये कोणत्या 4 टीम खेळणार? हे अजून स्पष्ट झालेलं नाही. इंग्लंड ही सेमी फायनलला पोहोचणारी पहिली टीम ठरली आहे. तर श्रीलंका ही सेमी फायनलच्या रेसमधून बाहेर झालेली सुपर-8 मधली पहिली टीम ठरली.
advertisement
2/7
सेमी फायनलच्या या रेसमध्ये अजून भारत, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे या 6 टीम आहेत. या 6 पैकी 3 टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील. त्यानंतर दोन सेमी फायनल आणि 8 मार्चला टी-20 वर्ल्ड कपची फायनल होईल.
advertisement
3/7
टी-20 वर्ल्ड कप संपल्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्येच आयपीएल 2026 ला सुरूवात होणार आहे. 26 मार्च ते 31 मे 2026 पर्यंत भारतामध्ये आयपीएलचा थरार रंगेल, पण आयपीएलमध्ये हा वर्ल्ड कप गाजवणारा खेळाडू खेळू शकणार नाही.
advertisement
4/7
इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने मंगळवारी पाकिस्तानविरुद्ध शतकी खेळी केली आणि त्याच्या टीमला वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचवलं. हॅरी ब्रुक हा सध्याचा टी-20 क्रिकेटमधल्या सर्वोत्तम बॅटरपैकी एक आहे, पण त्याच्यावर आयपीएलमध्ये बंदी घालण्यात आली आहे.
advertisement
5/7
आयपीएल 2026 आणि आयपीएल 2027 अशा दोन मोसमांसाठी ब्रुकवर बंदी घालण्यात आली आहे. आयपीएल 2025 च्या लिलावामध्ये ब्रुकला दिल्ली कॅपिटल्सने 6.25 कोटी रुपयांना विकत घेतलं, पण ब्रुकने शेवटच्या क्षणी माघार घेतली.
advertisement
6/7
इंग्लंड क्रिकेटला प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचं त्याने सांगितलं. पण बीसीसीआयच्या नियमानुसार आयपीएल लिलावासाठी नाव नोंदवणाऱ्या खेळाडूने दुखापतीच्या कारणाशिवाय माघार घेतली, तर त्याच्यावर दोन मोसमांसाठी बंदी घालण्यात येते.
advertisement
7/7
बीसीसीआयच्या या नियमामुळे हॅरी ब्रुक हा 2026 आणि 2027 अशी दोन वर्ष आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही. त्यामुळे आता हॅरी ब्रुकला आयपीएलमध्ये खेळायचं असेल तर त्याला 2028 च्या लिलावासाठी स्वत:चं नाव नोंदवावं लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 वर्ल्ड कपचा हिरो IPL मध्ये बॅन, एक चूक अन् BCCI ने हंटर चालवला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल