Mumbai Metro 11: मुंबईच्या पोटातून नवा रस्ता! धारावीच्या खालून थेट वांद्रे टर्मिनसपर्यंत भुयारी मेट्रो धावणार; असा असेल मार्ग
Last Updated:
Mumbai Metro 11 Update : मुंबईकरांनो लक्ष द्या मुंबईतील मेट्रो 11 मार्गिकेबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. नक्की कोणता बदल प्रवाशांना मिळणार आहे.
advertisement
1/7

मुंबई शहरातील सध्या लोकल नंतर मेट्रो मार्गाने नागरिक जास्त प्रवास करत आहेत. वारंवार काही अपडेट या अनेक मेट्रो मार्गिकेबाबत येत असताना सध्या अजून एका मेट्रो मार्गिकेबाबत आनंदाची बातमी समोर आलेली आहे.
advertisement
2/7
ज्यात मुंबई मेट्रो लाईन 11 या महत्त्वाच्या प्रकल्पात बदल आणि विस्तार जाहीर केलेला आहे. या प्रकल्पामुळे मुंबईतील मेट्रो नेटवर्क आणखी मजबूत होणार आहे.
advertisement
3/7
ही मेट्रो मार्गिका वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान पूर्णपणे भुयारी स्वरूपात उभारली जाणार आहे. ही मार्गिका मुंबई लाईन 4 म्हणजेच(वडाळा-कासारवडवली) शी जोडली जाणार असल्याने ठाणे आणि पूर्व मुंबईतील प्रवाशांना दक्षिण मुंबईत पोहोचणे अधिक सोपे होणार आहे.
advertisement
4/7
सुरुवातीला या मार्गिकेची लांबी 17.5 किमी ठेवण्यात आली होती. मात्र आता या प्रकल्पात 6.9 किमीची वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण मार्गाची लांबी जवळपास 24 किमीपर्यंत वाढेल तसेच स्थानकांची संख्या 14 वरून 19 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
5/7
नव्या आराखड्यानुसार चुनाभट्टी, शीव, मध्य धारावी, वांद्रे पश्चिम आणि वांद्रे टर्मिनस या नव्या स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. याआधी अनिक बस डेपो, सीजीएस कॉलनी, गणेशनगर, बीपीटी रुग्णालय, शिवडी, हे बंदर, बंदर कोल, रे रोड, भायखळा, नागपाडा जंक्शन, भेंडी बाजार, क्रॉफर्ड मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस , हॉर्निमन सर्कल आणि एसपीएम सर्कल ही स्थानके आधी ठरवली होती.
advertisement
6/7
नवीन आराखड्यानुसार शिवडीपासून पुढे ही भुयारी मार्गिका धारावी पुनर्विकास प्रकल्पाखालून पुढे नेण्यात येणार आहे. त्यानंतर मीठी नदी परिसरातून पुढे जाऊन ती वांद्रे टर्मिनसपर्यंत पोहोचेल.
advertisement
7/7
या मार्गिकेला मुंबई मेट्रो लाईन 3 आणि मुंबई मेट्रो लाईन 2B शीही जोडण्यात येणार आहे. त्यामुळे कुलाबा, बीकेसी आणि सीप्जसारख्या महत्त्वाच्या भागात जाणे अधिक सोयीचे होईल. या प्रकल्पासाठी सुमारे 23,487 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Metro 11: मुंबईच्या पोटातून नवा रस्ता! धारावीच्या खालून थेट वांद्रे टर्मिनसपर्यंत भुयारी मेट्रो धावणार; असा असेल मार्ग