Mumbai Weather: 48 तासांत वातावरण बदललं, छत्री नको, पुन्हा एसी लावा; पुढच्या दोन दिवसांसाठी दिला यलो अलर्ट
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
ठाणे, मुंबई आणि कोकण विभागामध्ये पुढच्या दोन दिवसांसाठी भारतीय हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. काल आणि आज महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर आता पुन्हा एकदा कडक उन्हाच्या झळा नागरिकांना बसणार आहेत. त्यामुळे पुढचे दोन दिवस घराबाहेर पडताना आपल्या तब्येतीची विशेष काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना आहे.
advertisement
1/5

महाराष्ट्रामध्ये सध्या काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचा कडाका सुरू आहे. अलीकडेच संपूर्ण महाराष्ट्राने मराठी नववर्षाची सुरूवात जल्लोषात आणि अगदी धुमधडाक्यामध्ये केली असता आता भारतीय हवामानशास्र विभागाने काही जिल्ह्यांसाठी पुढच्या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या पुढच्या दोन दिवसांमध्ये काही जिल्हे कडक उन्हाने होरपळून निघणार आहेत.
advertisement
2/5
गुढीपाडव्याच्या दिवशी 21 जिल्ह्यांना यलो अलर्ट तर 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला होता. त्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केलेली होती. त्यामुळे पावसाने अनेक शेतकऱ्यांचे शेती पिकं जमीनदोस्त झालेत. आज सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊसाचा इशारा दिला असून काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिलेला आहे. असं असताना आता मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांतही उष्णतेचा इशारा दिलेला आहे.
advertisement
3/5
दरम्यान, काल सायंकाळी मुंबई आणि परिसरामध्ये थंड हवेचे प्रमाण मोठ्या प्रमाण होते. शिवाय, वारा सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुटला होता. इतकंच नाही तर आज पावसाची शक्यता असताना रविवार आणि सोमवार असे दोन दिवस उष्णतेच्या लाटेबद्दल यलो अलर्ट दिलेला आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांतील काही भागांमध्ये उष्ण आणि दमट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना घराबाहेर पडताना उन्हापासून संरक्षण करणाऱ्या वस्तू घेऊन बाहेर पडावं लागणार आहे.
advertisement
4/5
रविवार (22 मार्च) आणि सोमवार (23 मार्च) असे दोन दिवस घराबाहेर पडताना स्वत:ची काळजी घ्यावी लागणार आहे. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता दिली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या या इशार्‍यानंतर नागरिकांना आपल्या जिल्ह्यातलं वेळोवेळी हवामान तपासात राहाण्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, अलीकडेच हवामान विभागाने हवामानाचा दिलेला अंदाज पाहून अनेक शेतकरी चिंतेत आलेला आहे.
advertisement
5/5
दरम्यान, आज कोकणातील अस्मानी संकट टळलं असून पुन्हा वारं फिरलं आहे. आज मुंबईसह बहुतांश कोकणात पावसाची शक्यता नाही. हवामान मुख्यत: ढगाळ आणि दमट राहील. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उकाडा जास्त जाणवेल. तर काही भागात मेघगर्जनेसह हलका पाऊस होईल. कमाल तापमान 32-35 अंशांच्या दरम्यान राहिल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Weather: 48 तासांत वातावरण बदललं, छत्री नको, पुन्हा एसी लावा; पुढच्या दोन दिवसांसाठी दिला यलो अलर्ट