TRENDING:

Cyclone Michaung : भारतात इथं धडकलं मिचॉन्ग चक्रीवादळ, धडकी भरवणारे PHOTO; आता गुरूवारपर्यंत...

Last Updated:
मिचॉन्ग चक्रीवादळाने भारतात हाहाकार माजवला आहे.
advertisement
1/6
भारतात इथं धडकलं मिचॉन्ग चक्रीवादळ, धडकी भरवणारे PHOTO; आता गुरूवारपर्यंत...
चक्रीवादळ मिचॉन्ग अखेर तामिळनाडूला सोडून आंध्र किनारपट्टीवर धडकलं. त्याचा वेग ताशी 90 ते 110 किमी होताय IMD सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिचॉन्ग <a href="https://news18marathi.com/tag/cyclone/">चक्रीवादळ</a> मंगळवारी दुपारी 1.40 च्या सुमारास आंध्र प्रदेशातील बापटला भागात धडकलं.
advertisement
2/6
कोनासिमा, काकीनाडा, कृष्णा, बापटला आणि प्रकाशम यासह आंध्र प्रदेशातील सात जिल्ह्यांतील 9,454 नागरिकांना 211 मदत शिबिरांमध्ये आधीच सुरक्षितपणे हलवण्यात आलं.
advertisement
3/6
तमिळनाडूमध्ये चक्रीवादळामुळे मुसळधार पावसामुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणाले की, या वेळच्या पावसाने 2015 चा रेकॉर्ड ओलांडला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूमध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे
advertisement
4/6
दुसरीकडे, बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळाचा प्रभाव ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये देखील पाऊस पाडण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे बंगालमध्ये दिवसभर ढगाळ आकाश राहिल. दक्षिण बंगालमधील पूर्व आणि पश्चिम मेदिनीपूर, पुरुलिया, बांकुरा यासह किनारपट्टीवरील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो
advertisement
5/6
मंगळवारपासून दक्षिण बंगाल आणि ओडिशाच्या लगतच्या किनारी जिल्ह्यांमध्ये हवामान बदलेल. पूर्व आणि पश्चिम मेदिनीपूर झारग्राम आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यांमध्ये मंगळवार आणि गुरुवार दरम्यान आणखी पावसाची शक्यता आहे. उत्तर 24 परगणा, बांकुरा, हावडा, हुगळी, पूर्व बर्दवान, नादिया आणि कोलकाता जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
advertisement
6/6
मंगळवार ते गुरुवार हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता सोसाट्याचा वारा असेल. मात्र, चक्रीवादळामुळे बंगालच्या किनारपट्टीवरील मच्छिमारांसाठी कोणताही इशारा नाही. शुक्रवारपासून हवामान बदलण्यास सुरुवात होईल शनिवार आणि रविवारपासून थंडीचा मूड परतण्याची शक्यता आहे
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
Cyclone Michaung : भारतात इथं धडकलं मिचॉन्ग चक्रीवादळ, धडकी भरवणारे PHOTO; आता गुरूवारपर्यंत...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल