PHOTOS : गळ्यात चैन, हातात 25 हजाराचा टॅब, हा डिजिटल भिकारी 50 रुपयांपेक्षा कमी पैसे घेतही नाही
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
बिहार राज्यातील बेतिया रेल्वे स्टेशनवर राजू प्रसाद पटेल नावाचा एक भिकारी राहतो. या भिकाऱ्याच्या गळ्यात क्यूआर कोड आणि हातात टॅब असतो. आश्चर्य म्हणजे राजू प्रसाद हा प्रवाशांकडून एक-दोन रुपये नाही तर कमीकत कमी 50 रुपए घेतो. राजू प्रसादला लालू प्रसाद यादव यांनी रेल्वे मंत्री असताना खूप मोठी भेटवस्तू दिली होती. (आशीष कुमार/पश्चिम चंपारण)
advertisement
1/5

हातात महागडा टॅब आणि गळ्यात क्युआर कोड लावलेला भिकारी तुम्ही पाहिला नसेल. मात्र, असा एक भिकारी आहे, ज्याच्या हातात 25 हजाराचा टॅब आणि पॉकेटमध्ये 10-15 हजार रुपये असतात. तसेच तो ऑनलाईन भिक मागतो.
advertisement
2/5
बेतिया रेल्वे स्टेशनवर खूप लहान वयापासून राहून भीक मागणारा राजू एक असा भिकारी आहे, जो तिसरीपर्यंत शिकला आहे. पण चांगल्यापद्धतीने टॅब चालवतो. तसेच भिकमध्ये कमीत कमी 50 रुपये घेतो.
advertisement
3/5
जेव्हा लोकल18 च्या टीमने त्याला विचारले की, जेव्हा संपूर्ण जग कोरोनाच्या संकटात होते तेव्हा त्याने काय केले. तर तो म्हणाला की, लॉकडाऊनच्या काळात त्याने भगवे वस्त्र परिधान करून साधूचे रुप धारण केले होते आणि स्टेशन सोडून कोणत्याही बंधनाशिवाय तो शहरात भटकत राहायचा.
advertisement
4/5
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना राजू आपले वडील सांगतो. त्यामुळे गमतीने त्याला लालू यांचा मुलगा असे त्यांना बेतियावासी म्हणतात. जेव्हा लालू यादव रेल्वेमंत्री होते, तेव्हा त्यांच्या बेतिया दौऱ्यात राजूने त्यांची भेट घेतली आणि त्यांना पापा असे म्हटले. राजूने लालू यादव यांना त्याच्या खर्चाबाबतही सांगितले होते. त्यानंतर त्यांनी राजूसाठी संपूर्ण बिहारमध्ये मोफत रेल्वे प्रवास उपलब्ध करून दिला आणि त्याच्या खाण्यापिण्याचीही मोफत व्यवस्था केली.
advertisement
5/5
राजूने लोकांकडून मिळालेल्या पैशातून सॅमसंगचा टॅब घेतला. सोबत स्टेशनवरील दुकानांतील क्यूआर कोड स्कॅनर पाहून डिजिटल ट्रांजेक्शन शिकला. यानंतर स्थानिक दुकानदाराने त्याचे एक अकाऊंट तयार करुन त्याला एक क्युआर कोड मिळवून दिला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
PHOTOS : गळ्यात चैन, हातात 25 हजाराचा टॅब, हा डिजिटल भिकारी 50 रुपयांपेक्षा कमी पैसे घेतही नाही