मुघलकालीन बुद्धिबळ, दागिने आणि अत्तर; फोटो पाहून व्हाल हैराण!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
मुघलकाळात शासक कोणत्या प्रकारचा बुद्धिबळ खेळ खेळायचे, हे तुम्हाला माहितीये का? नसेल माहिती तर आज आम्ही तुम्हाला या खेळाचा एक फोटो दाखवणार आहोत. त्याचबरोबर त्या काळातील स्त्रियांचे आवडते दागिनेसुद्धा पाहूया.
advertisement
1/5

लखनऊच्या निराला नगरातील रेगनेंट हॉटेलच्या तळमजल्यावर एक प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये मुघल काळातील वस्तू सादर करण्यात आल्या. या फोटोमध्ये आपण पाहू शकता त्या काळात आकर्षक असा बुद्धिबळाचा खेळ असायचा. ज्यामध्ये मातीचा राजा आणि सैनिक होते.
advertisement
2/5
मुघल काळातील महिलांचे अनोख्या पद्धतीचे दागिनेही इथे आहेत. फोटोमध्ये आपण पैंजण पाहू शकता. हे चांदीचं पैंजण अतिशय जड आणि मोठं आहे.
advertisement
3/5
या प्रदर्शनात सर्वाधिक चर्चा झाली ती मुघलकालीन मेकअप बॉक्सची. हा बॉक्स हृदयाच्या आकाराचा आहे. बॉक्स उघडल्यावर आत दोन लहान डब्ब्या दिसतात, या डब्ब्यांमध्ये महिला सौंदर्य प्रसाधने ठेवायच्या.
advertisement
4/5
प्रदर्शनात नवाबांच्या अत्तराच्या बाटल्याही पाहायला मिळाल्या. या बाटल्या चांदीच्या आणि आकर्षक आहेत. आता अशी बाटली कुठेही पाहायला मिळत नाही.
advertisement
5/5
मुघलकाळात खायच्या पानाचा डबादेखील अतिशय सुंदर असायचा. चांदीचा हा डबा एखाद्या खजिनाच्या पेटीसारखा दिसायचा.