Weather Alert: ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तुफान पाऊस? हवामान विभागाकडून नवी माहिती
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
गुरुवारी कोकणसह इतरही भागांत पावसाचा जोर कमी होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पावसाची स्थिती कशी राहील पाहुयात.
advertisement
1/7

पावसाळा सुरू झाल्यापासून पावसाची विचित्र स्थिती सर्वत्र बघायला मिळत आहे. काही भागांत जोरदार पाऊस तर काही भागांत शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. श्रावण महिन्याच्या सुरुवातीला राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली होती. कोकण, घाटमाथा परिसर, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत चांगला पाऊस झालाय.
advertisement
2/7
बुधवारी देखील कोकण आणि विदर्भात पाऊस झालाय. मात्र, गुरुवारी कोकणसह इतरही भागांत पावसाचा जोर कमी होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. तर विदर्भात पुढील तीन ते चार दिवस गडगडाटी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ऑगस्टच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पावसाची स्थिती कशी राहील पाहुयात.
advertisement
3/7
पावसाला आता अनुकूल वातावरण नसल्याने पुढचे काही दिवस राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. काही भागात हलक्या श्रावण सरी अजूनही सुरू आहेत. मात्र, कुठेही मुसळधार पावसाची शक्यता नाही. मुंबईसह कोकण विभागातील काही जिल्ह्यांत बुधवारी चांगला पाऊस झालाय.
advertisement
4/7
मात्र, गुरुवारपासून पुढील काही दिवस कोकण विभागात पावसाचा जोर कमी राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि इतर शहरातही पावसाची शक्यता कमी असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे.
advertisement
5/7
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यातही पावसाचा जोर कमी असणार आहे. हलक्या श्रावण सरी बरसण्याची शक्यता आहे. मात्र, कुठेही मुसळधार पावसाची शक्यता नाही. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर या भागात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
advertisement
6/7
विदर्भातील काही जिल्ह्यांत गेले तीन दिवस सतत पाऊस सुरू आहे. तसेच पुढील तीन ते चार दिवस विदर्भात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत मुसळधार शक्यता वर्तवण्यात आली आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांत पावसाचा जोर जास्त असण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
राज्यातील इतर भागांत कुठलीही पावसाची शक्यता नाही. मात्र, विदर्भात पुढील तीन ते चार दिवस पावसाचे असणार आहे. मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांनी सुद्धा पिकांची काळजी घेणे आणि योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तुफान पाऊस? हवामान विभागाकडून नवी माहिती