TRENDING:

Weather alert: राज्यात गुरुवारचा दिवस मुसळधार पावसाचा, 3 जिल्ह्यांना रेड तर 11 जिल्ह्यांनाही यलो अलर्ट जारी

Last Updated:
राज्यामध्ये पावसाची तीव्रता पुढील काही दिवसांमध्ये वाढण्याची शक्यता आहे. पुढील 24 तास अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
1/7
राज्यात गुरुवारचा दिवस मुसळधार पावसाचा,11 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
राज्यामध्ये पावसाची तीव्रता पुढील काही दिवसांमध्ये वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण किनारपट्टीवर पुढील 24 तास अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
2/7
मुंबईसह ठाणे, पालघर येथे मुसळधार पाऊस तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पाहुयात 24 जुलै रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
3/7
कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या तीन जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, तर मुंबई, ठाणे आणि पालघरला ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे.
advertisement
4/7
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, पुणे अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये हवामान विभागाने कोणताही अलर्ट दिलेला नसला तरी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.
advertisement
5/7
विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
6/7
दरम्यान, कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
advertisement
7/7
त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट भागांमध्ये देखील अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही तास मुंबई आणि कोकणातील जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे असणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather alert: राज्यात गुरुवारचा दिवस मुसळधार पावसाचा, 3 जिल्ह्यांना रेड तर 11 जिल्ह्यांनाही यलो अलर्ट जारी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल