TRENDING:

Weather Alert: पुढील 24 तास धोक्याचे, राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार, 18 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
राज्यात 23 जुलै रोजी विविध भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण विभाग आणि राज्यातील सर्व घाटमाथा परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
1/7
पुढील 24 तास धोक्याचे, राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार, 18 जिल्ह्यांना अलर्ट
राज्यात 23 जुलै रोजी विविध भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण विभाग आणि राज्यातील सर्व घाटमाथा परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत. पाहुयात, 23 जुलै रोजी राज्यात हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
2/7
कोकणातील पालघर आणि मुंबईतील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर ठाणे जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे पालघर, मुंबई आणि ठाणे या तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
3/7
पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याने या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे शहरासह कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड येथे विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. नाशिक घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. या तिन्ही ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.
advertisement
6/7
विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांत मात्र कुठलीही पावसाची शक्यता नाही.
advertisement
7/7
राज्यातील विविध भागांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे. घाटमाथ्याच्या आणि कोकण किनारपट्टीच्या भागांतून प्रवास करणाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: पुढील 24 तास धोक्याचे, राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार, 18 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल