Weather Alert: वादळी वारा अन् विजांचा कडकडाट, रविवारी राज्याला पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
22 जून रोजीसाठी देखील हवामान विभागाने राज्यात काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि यलो अलर्ट जारी केले आहेत. परंतु, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची उघडीप कायम राहील अशी शक्यता आहे.
advertisement
1/7

राज्यात पावसाचे असमान वितरण पाहायला मिळत आहे. कोकणात मुसळधार पाऊस तर मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.
advertisement
2/7
22 जून रोजीसाठी देखील हवामान विभागाने राज्यात काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि यलो अलर्ट जारी केले आहेत. परंतु, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची उघडीप कायम राहील अशी शक्यता आहे. पुढील 24 तासांत हवामान कसे असेल पाहुयात.
advertisement
3/7
मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर कोकणातील ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
advertisement
4/7
या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
5/7
पुण्याच्या घाट परिसराला ऑरेंज अलर्ट तर सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे.
advertisement
6/7
मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिवमध्ये हलक्या सरीची शक्यता आहे.
advertisement
7/7
विदर्भात अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांसह पावसाची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: वादळी वारा अन् विजांचा कडकडाट, रविवारी राज्याला पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना अलर्ट