Vande Bharat Express: पुण्याहून नागपूर अवघ्या 12 तासांत, देशातील सर्वांत लांब पल्ल्याची वंदे भारत, थांबे अन् वेळापत्रक संपूर्ण माहिती
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Nagpur Pune Vande Bharat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात लांब पल्ल्याच्या नागपूर पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून सेवेचा शुभारंभ केला.
advertisement
1/7

महाराष्ट्रातील विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अंतर आणखी कमी होणार आहे. नागपूरमधील अजनी ते पुणे जंक्शन दरम्यान देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी, 10 ऑगस्ट रोजी या नव्या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून सेवेचा शुभारंभ केला.
advertisement
2/7
नागपूरमधील अजनी ते पुणे ही विदर्भातील चौथी वंदे भारत एक्सप्रेस आहे. विशेष म्हणजे ही 881 किलोमीटर अंतर कापणारी देशातील सर्वात लांब पल्ल्याची गाडी असेल. अवघ्या 12 तासांत नागपूर ते पुणे अंतर पार केले जाईल.
advertisement
3/7
नागपूर पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला अजनी (नागपूर) हून सुटल्यानंतर वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर, दौंड कॉर्ड लाइन या स्टेशनवर थांबा असेल. शेवटचं स्टेशन पुणे असेल.
advertisement
4/7
पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेस ही 11 ऑगस्टपासून मंगळवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. गाडी क्र. 26101 ही पुणे स्टेशनवरून सकाळी 6.25 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 6.25 वाजता अजनी (नागपूर) स्टेशन वर पोहचेल.
advertisement
5/7
नागपूर पुणे गाडी क्र. 26102 ही सोमवार वगळून आठवड्यातील सहा दिवस धावणार आहे. ही गाडी अजनी (नागपूर) येथून दररोज सकाळी 9.50 वाजता सुटेल. रात्री साडे 9.50 वाजता पुण्यात पोहचेल.
advertisement
6/7
नागपूर पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला एकूण 8 डबे असणार आहेत. यामध्ये एक एक्झिक्युटिव्ह चेअर कार, सात चेअर कार अशी एकूण प्रवासी क्षमता 590 असेल.
advertisement
7/7
दरम्यान, नागपूर (अजनी)- पुणे अंतर 881 किलोमीटरचं असून या मार्गावरुन धावणाऱ्या हावडा- पुणे या एक्स्प्रेसला पुणे -नागपूर अंतर पार करण्यासाठी 12 तास 50 मिनिटे लागतात. तर, पुणे- अजनी एसी स्पेशल ट्रेन 13 तास 35 मिनिटे वेळ लागतो. पण हेच अंतर अजनी- पुणे वंदे भारत एक्स्प्रेस 12 तासात पूर्ण करेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Vande Bharat Express: पुण्याहून नागपूर अवघ्या 12 तासांत, देशातील सर्वांत लांब पल्ल्याची वंदे भारत, थांबे अन् वेळापत्रक संपूर्ण माहिती